Join us  

गुलाब जामुन चाट! गुलाबजाम पराठ्यानंतर हा विचित्र पदार्थ पाहून संतापले नेटकरी, म्हणाले....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 6:29 PM

Social Viral: ज्यांना गुलाबजाम (Gulabjamun chat) मनापासून आवडतात, त्यांना हा भयंकर विचित्र पदार्थ पाहून चांगलाच राग येणार आहे... हे असले कसले पदार्थ करता रे... असं म्हणत नेटकरी जाम चिडले आहेत...(food and recipe)

ठळक मुद्देछान गोड, चवदार, मधाळ गुलाबजामुनचा कोणी चाट कसा काय बनवून शकतो, हा प्रश्न पडला असेल, तर सोशल मिडियावर सध्या जबरदस्त व्हायरल झालेला हा व्हिडिओ एकदा बघाच.

पापडी चाट, कचोरी चाट, रगडा चाट असे चाट प्रकारात मोडणारे नाना प्रकार तुम्ही ऐकले असणार आणि चाखूनही पाहिले असणार... पण आता तर एकाने नवाच शोध लावला असून चक्क करोडो खवय्यांची जान असणाऱ्या गुलाबजामुनवरच एक अचाट प्रयोग (Weird Food Combination) केला आहे. मागे एकदा एका जणाने गुलाबजामुन पराठा (gulab jamun paratha) करून खवय्यांना डिवचले होते... आता या महाशयांनी चक्क गुलाबजामुन चाट (Gulabjamun chat) बनवला आहे...

 

छान गोड, चवदार, मधाळ गुलाबजामुनचा कोणी चाट कसा काय बनवून शकतो, हा प्रश्न पडला असेल, तर सोशल मिडियावर सध्या जबरदस्त व्हायरल (viral video) झालेला हा व्हिडिओ एकदा बघाच.. हा व्हिडिओ पाहून गुलाबजामुनी प्रेमी जाम चिडले असून ..'अरे तुम्ही खा ना.. पण हे छान छान पदार्थांसोबत हे असले Weird food combination करून पदार्थाची मुळ चव का घालवून टाकता', असा प्रश्न खवय्ये विचारत आहेत.  आता हेच राहिलं होतं, काय तर म्हणे गुलाबजाम पराठा! 'असा' पराठा पाहून नेटकरी वैतागत म्हणाले..

 

इन्स्टाग्रामच्या tonguetwisters या पेजवर हा व्हिडिओ शेअर (instagram share) करण्यात आला आहे. यामध्ये हा पदार्थ ज्या कुणी बनवला आहे, त्याने आधी एका प्लेटमध्ये चार गुलाबजाम ठेवले. त्यानंतर त्यावर दही टाकलं. त्यानंतर कोणत्याही चाट प्रकारात असतात त्या दोन प्रकारच्या चटण्या टाकल्या. यापैकी एक होती चिंच- गुळाची आंबटगोड चटणी. तर दुसरी होती पुदिना मिरचीची तिखट चटणी. यानंतर त्यावर बारीक शेव आणि पुऱ्यांचा चुरा करून टाकण्यात आला. त्यानंतर सगळ्यात शेवटी डाळिंबाचे दाणे आणि चाट मसाला टाकून त्याने हा पदार्थ खवय्यांना खायला दिला.. पदार्थाची चव घेतल्यानंतर तो खवय्या काहीच बोलला नाही... पण Seriously achi thi yr, tum loog gali doge acha likh dia toh..... अशी कमेंट त्याने इन्स्टाग्रामवर या व्हिडिओला दिली आहे.. बघा तुम्हाला जर व्हिडिओ पाहून गुलाबजामुन चाट करावा वाटला, तर रेसिपी नक्की ट्राय करा.. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाइन्स्टाग्रामअन्नपाककृती