असाही एखादा पदार्थ असू शकतो, अशी आपण कल्पनाही केलेली नसते. पण सोशल मिडियावर सध्या असेच एकापेक्षा एक अचाट, अतरंगी पदार्थ आणि त्यांच्या रेसिपी (viral recipe) बघायला मिळत आहेत. आणि विशेष म्हणजे ते सगळेच पदार्थ जबरदस्त व्हायरल होत आहेत. आतापर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारची भजी ऐकलेली, पाहिलेली आणि खाल्लेली आहेत. तसेच चॉकलेट शेक, चॉकलेट बर्फी, चॉकलेट आइस्क्रिम असे पदार्थही चाखून पाहिलेले असतात. पण आता मात्र काही जणांनी चॉकलेट आणि भजी हे दोन पदार्थ एकत्र आणून चक्क चॉकलेट भजी (Weird Food Combination: chocolate pakode) तळण्याचाच घाट घातला आहे. बघा हा व्हायरल व्हिडिओ.
हा पदार्थ आणि त्याची रेसिपी सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत आहे. काही जणांना या पदार्थाचं नाव ऐकून तो खावासा वाटतो आहे, तर काही जणांना असंही काही कॉम्बिनेशन असतं, हे ऐकूनच कसंकसं होत आहे.
नवरात्र स्पेशल फूड : उत्तम पचनासाठी आठवणीने खावेत जवस, एक चमचाभर जवस तब्येतीसाठी ठरतात वरदान
ही रेसिपी इन्स्टाग्रामच्या radiokarohan या पेजवर शेअर करण्यात आली आहे. रेसिपी बघून जर तुम्हाला हा पदार्थ खावा वाटला, तर अगदी घरच्या घरी तुम्ही तो करून बघू शकता. कारण रेसिपी तशी अगदीच सोपी आहे. हा व्हिडिओ भारतातल्या नेमक्या कोणत्या शहरातला आहे, याचा उल्लेख नाही. पण तो मात्र जबरदस्त व्हायरल होत आहे.
जी महिला ही रेसिपी करते आहे, तिने भजी करण्यासाठी आपण जसं बेसन पीठ भिजवून घेतो, तसं ते भिजवून घेतलं.
नवरात्र स्पेशल व्यायाम: रोज करा फक्त ५ मिनिटे फेस योगा, चेहरा दिसेल कायम तरुण- सतेज
त्यानंतर एक डेअरीमिल्क कॅडबरी अख्खी त्या पिठात बुडवली. आणि नंतर ती कढईमध्ये गरम तेलात तळण्यासाठी सोडून दिली. खरपूस तळून झालेले हे चॉकलेट पकोडे किंवा चॉकलेट भजी एका प्लेटमध्ये ठेवून त्यावर मसाला टाकला आणि ही भजी आलेल्या खवय्यांना खायला दिली..