Join us  

हे काय भलतंच! चक्क गरमागरम तिखट मसाला जिलेबी? हा प्रयोग पाहूनच खवय्ये म्हणाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2022 6:19 PM

Viral Photo of Hot Spicy Masala Jalebi: खाण्याच्या पदार्थांसोबत कोण उठून काय प्रयोग करेल आणि त्यापासून कोणतं अचाट कॉम्बिनेशन तयार होईल, हे काही विचारायलाच नको.. त्यातलाच हा एक प्रकार

ठळक मुद्देबहुतांश लोकांना जिलेबीसोबत करण्यात आलेला हा प्रयोग अजिबातच आवडलेला नाही. तर खूपच थोड्या लोकांनी यात रस दाखवून तो एकदा खाऊन बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पदार्थांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स केल्याशिवाय नव्या रेसिपी आकाराला येत नाहीत. त्यामुळे एखाद्या पदार्थाला थोड्या वेगळ्या पद्धतीने फोडणी घालणे, एखाद्या पदार्थामध्ये चिमुटभर साखरेची पेरणी करणे असे अनेक प्रयोग प्रत्येक स्त्री तिच्या स्वयंपाक घरात करतच असते. त्यामुळेच तर पदार्थ एकच असला तरी प्रत्येकीच्या हातच्या पदार्थांची चव वेगवेगळी असते. असं प्रयोग करणं योग्यच आहे. पण प्रयोगांच्या नावाखाली जेव्हा वेगवेगळे गुणधर्म असणारे पदार्थ एकत्र केले जातात (Weird Food Combination), तेव्हा मात्र ते प्रयोग खवय्यांची नाराजी ओढावून घेतात. मसाला जिलेबीचा हा प्रयोगही त्यातलाच.(Have you tried hot spicy masala Jalebi)

जिलेबी म्हणताच डोळ्यासमोर येते ती साखरेच्या पाकात भिजलेली नारंगी- पिवळी आणि चवीला अगदी गोडमिट्ट असणारी जिलेबी.

करिश्मा कपूरचा सुपरकुल मिडी ड्रेस, थर्टीफर्स्टच्या पार्टीसाठी ठरू शकतो परफेक्ट... बघा ड्रेसची किंमत

कुरकुरीत आणि अगदी योग्य प्रमाणात गोड असलेली जिलेबी तोंडात टाकताच, खवय्यांना काय तो आनंद होतो.. आता रबडी- जिलेबी हे कॉम्बिनेशनही बऱ्यापैकी हीट झालं आहे. अनेक हॉटेलमध्ये किंवा लग्न समारंभात तर हा पदार्थ स्पेशल मेन्यू म्हणून ठेवला जातो. इथपर्यंत ठिक आहे. पण आता मात्र काही जणांनी चक्क गरम मसाल्यात तिखट जिलेबी तयार केली आहे. 

 

@mayursejpal या ट्विटर हॅण्डलवरून या मसाला जिलेबीचा फोटो शेअर करण्यात आला असून त्याला Anyone want masala jalebi? असं कॅप्शन देण्यात आलं आहे.

मधुमेह, बीपी, कॅन्सर हे आजार कमी वयातच होऊ नयेत म्हणून.... बघा तज्ज्ञ काय सांगतात

या कॅप्शनला उत्तर म्हणून अनेक जणांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. बहुतांश लोकांना जिलेबीसोबत करण्यात आलेला हा प्रयोग अजिबातच आवडलेला नाही. तर खूपच थोड्या लोकांनी यात रस दाखवून तो एकदा खाऊन बघण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हा पदार्थ नेमका कोणी तयार केला, तो कुठे मिळतो, याची कोणतीही माहिती सोशल मिडियावर नाही. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलट्विटरअन्न