बिर्याणी असं नुसतं कोणी नाव जरी घेतलं तरी सगळ्यात आधी जाणवायला लागतो तो बिर्याणीत घातलेल्या मसाल्यांचा सुगंध... बिर्याणी आणि मसाले हे एक अगदी घट्ट कॉम्बिनेशन आहे. मसाल्यांशिवाय बिर्याणी नाहीच.. आता मसाल्यांमुळे बिर्याणीची चवही कशी अगदी झणझणीत, ठसकेबाज होते. ही चवच तिची खरी ओळख असताना एका महिलेने मात्र त्यावरच जबरदस्त मारा केला आणि बिर्याणीला तिच्या मूळ रुपापासून, चवीपासून खूप खूप दूर केलं. बघा नेमकं काय केलं... (viral video of mango biryani recipe)
creamycreationsbyhkr या इन्स्टाग्राम पेजवरून मँगो बिर्याणीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ती असं सांगते आहे की उन्हाळ्यासाठी खास आयोजित करण्यात आलेल्या पार्टीसाठी तिने हा पदार्थ बनवला आहे.
तुमच्या- आमच्या घरात नेहमीच होणारा 'हा' पदार्थ जगातल्या वाईट पदार्थांच्या यादीत! बघा तो कोणता
कारण उन्हाळा असल्याने त्या कार्यक्रमाची थीम मँगो अशी ठेवण्यात आली आहे. तिने स्वत:देखील आंबा रंगाचे कपडे घातले असून मागे जे काही डेकोरेशन केलेलं आहे ते ही आंबा रंगातलंच आहे. कपडे, डेकोरेशन इथपर्यंत पुरे होतं. पण बिर्याणीमध्ये चक्क आमरस घातला हे अनेक खवय्यांना खूप खटकलं आहे.
असे भलतेच पदार्थ करून बिर्याणी या लोकप्रिय पदार्थाची चव घालवू नका. आणि फळांचा राजा आंब्याचाही अपमान करून नका, अशा आशयाच्या अनेक कमेंट त्या व्हिडिओला आल्या आहेत.
राधिका मर्चंटच्या विंटेज ड्रेसपेक्षा सातपट महाग आहे तिची पर्स, बघा या दोन्ही वस्तूंची खासियत....
कैरी टाकून केलेली बिर्याणी काही जण करतात. अनेकांना ती आवडतेही. पण चक्क आमरस घालून केलेला हा प्रकार मात्र खूप कमी लोक स्विकारू शकतात. हा पदार्थ पाहून बिर्याणी लव्हर्सने तर त्यांची थेटच नाराजी जाहीर केली आहे.