Join us  

गुलाबी रंगाचा ड्रॅगन फ्रुट चहा? हिंमत असेल तर हा चहा पिऊन दाखवाच.. व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2022 3:43 PM

Dragon Fruit Tea: सोशल मिडियावर (social media) कधी कोणता पदार्थ व्हायरल होईल, हे काही सांगताच येत नाही.. असाच एक पदार्थ सध्या गाजतो आहे. 

ठळक मुद्देहा प्रयोग पाहून अनेक चहाप्रेमी चांगलेच खवळले आहेत तर काही जणांनी हा असा भलताच चहा पिण्याची इच्छा असल्याचंही बोलून दाखवलं आहे.

चहा हे जगातलं सर्वाधिक प्यायलं जाणारं एक पेय. कडक चहाचा एक घोट घेतला की मन कसं फ्रेश होऊन जातं.. नव्याने काम करण्याचा हुरूप येतो. चहा म्हणजे अनेक जणांना जवळपास अमृतासारखा भासत असतो. सकाळचा चहा आणि दुपारचा चहा हे दोन चहा तर अनेक जण शक्यतो कधीच चुकवत नाही. आता एवढ्या परमप्रिय चहासोबत एका चहाविक्रेत्याने एक भलताच प्रयोग केला आहे. हा प्रयोग (Weird Food Combination) पाहून अनेक चहाप्रेमी चांगलेच खवळले आहेत तर काही जणांनी हा असा भलताच चहा पिण्याची इच्छा असल्याचंही बोलून दाखवलं आहे.(Viral video of dragon fruit tea)

 

मसाला चहा, अद्रकाचा चहा, दुधाचा चहा, बिनदुधाचा चहा... हे चहाप्रकार आपल्या चांगल्याच परिचयाचे. हल्ली आलेले लेमन टी, ग्रीन टी यांच्याशी देखील आपण बऱ्यापैकी जुळवून घेतलंच आहे.

नवरात्र स्पेशल फूड : लालचुटूक बीट खाण्याचे ५ फायदे, वजन आणि बीपीचं टेन्शन आहे तर..

पण आता मात्र सोशल मिडियावर सध्या एक वेगळाच चहा धुमाकूळ घालतो आहे. आणि तो म्हणजे गुलाबी रंगाचा ड्रॅगन फ्रुट चहा... thegreatindianfoodie या इन्स्टाग्राम पेजवरून हा चहा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा चहा बांग्लादेशला मिळतो. पण तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही असा चहा घरीही बनवू शकता कारण रेसिपी तशी अगदीच सोपी आहे. 

 

कसा बनवला ड्रॅगन फ्रुट चहा?१. हा चहा करण्यासाठी त्या विक्रेत्याने सगळ्यात आधी आपण नेहमी जसा चहा करतो तसा साखर, चहा पावडर, दूध, पाणी टाकून चहा केला आणि तो एका ग्लासमध्ये ओतला. 

अक्रोड खाऊन टरफलं फेकून देऊ नका! पांढऱ्या केसांसाठी करा त्याचा उत्तम उपाय, केस होतील काळेभोर, घनदाट

२. त्यानंतर ड्रॅगन फ्रुट फोडले आणि त्याच्या आतला गर चमच्याने काढून तो त्या गरमागरम चहामध्ये टाकला.

३. त्यानंतर चक्क चमचाभर कन्डेन्स मिल्क घेतले आणि ते देखील चहामध्ये टाकले. असा हा भन्नाट चहा मग त्याने ग्राहकांना पिण्यासाठी दिला. 

४. आता हा गुलाबी रंगाचा थंडगार चहा कसा लागला, हे तर पिणाऱ्यालाच माहिती. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाइन्स्टाग्राम