खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये वेगवेगळे प्रयोग करून पाहाणं, प्रयोग करून त्याची चव बदलण्याचा किंवा तो पदार्थ आणखी चवदार करण्याचा प्रयत्न करणं, हे सगळं समजण्यासारखं आहे. पण म्हणून काय एखाद्याने चक्क इडलीसोबत असा काही तरी गोंधळ घालावा, हे खवय्यांना, इडलीप्रेमींना आणि त्यातही खासकरून दक्षिण भारतीय मंडळींना अजिबातच आवडलेलं नाही. काय तर म्हणे या खवय्याने आईस्क्रिम करण्याच्या नावाखाली इडलीचं आईस्क्रिम बनवलं आहे. बघा नेमकं केलंय तरी काय त्याने असं... (viral video of idli sambar flavour ice cream)
सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे आपलं सतत आईस्क्रिम खाणं होतंच. त्यामुळे बऱ्याचदा आपण प्रत्येकवेळी वेगवेगळे फ्लेवर ट्राय करण्याचा प्रयत्न करतो. पण आतापर्यंत हे इडली- सांबार फ्लेवरचं आईस्क्रिम कुणीही खाल्लं नसणार.
तुम्हाला घ्यायची का स्वत:च्या नावाची साडी पिन आणि ब्रोच? बघा कस्टमाईज फॅशनचा नवा ट्रेण्ड
किंवा ते आईस्क्रिम समोर आलं तरी खूपच कमी लोक ते खाण्याची इच्छा व्यक्त करतील. असं हे जगावेगळं आईस्क्रिम कसं तयार केलं जातं त्याची रेसिपी सांगणारा व्हिडिओ foodb_unk या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. तो व्हिडिओ आतापर्यंत ५ लाखांपेक्षाही जास्त लोकांनी पाहिला असून त्यावर आलेल्या कमेंट हेच दाखवतात की तो व्हिडिओ पाहून इडलीप्रेमी किती दुखावले आहेत.
इडली- सांबार फ्लेवरचं आईस्क्रिम करण्यासाठी सगळ्यात आधी त्या व्यक्तीने एका कुलिंग पॅनवर इडली टाकून ती मॅश केली. त्यावर सांबार टाकून ते इडलीसोबत एकत्र केले.
सहलीला जायचंय पण प्रवासात मळमळ- उलट्यांचा त्रास? आलिया भटची फिटनेस ट्रेनर सांगते सोपा उपाय
नंतर त्याने त्यावर आईस्क्रिम टाकलं आणि सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव केलं. हे आईस्क्रिम रोल करून ग्राहकांना देताना त्याने त्यावर पुन्हा एक इडलीचा तुकडा ठेवून त्यावर सांबार घालून ते सर्व्ह केलं... 'Who said break up hurts more! Aree mera idl', 'Crime : killing idli' , 'JAIL. IMMEDIATE JAIL' अशा आशयाच्या अनेक कमेंट या व्हिडिओला आल्या आहेत.