Join us  

Water melon Popcorn: खाऊन बघितलेत का कधी टरबूज पॉपकॉर्न? ही बघा पॉपकॉर्न बनविण्याची न्यारीच पद्धत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2022 1:11 PM

Viral Video of Watermelon Popcorn: चीज पॉपकॉर्न, टोमॅटो पॉपकाॅर्न, सॉल्टेड पॉपकॉर्न असे वेगवेगळ्या प्रकारचे पॉपकाॅर्न तुम्ही नक्कीच खाल्ले असणार. पण कधी टरबूज पॉपकॉर्न खाऊन पाहिलेत का? हा बघा सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल व्हिडिओ. (viral video)

ठळक मुद्देतुम्हाला जर ही रेसिपी पाहून टरबूज पॉपकॉर्न हे नवं कॉम्बिनेशन खाऊन बघण्याची इच्छा झाली असेल, तर घरच्या घरीही हा प्रयोग करता येईल. 

खाद्यपदार्थांच्या बाबतीत आजकाल कोण काय प्रयोग करेल, याचा काहीच नेम नाही. म्हणूनच तर कधी मॅगीवालं आईस्क्रिम (maggie icecream) खायला मिळतंय तर कधी गुलाबजामचे पराठे. याच पठडीतला आता हा आणखी एक प्रयोग आहे.. टरबूज पॉपकॉर्न. टरबूज आणि पॉपकॉर्न या दोन्ही पदार्थांचे खूप चाहते आहेत. पण म्हणून कोणी आजवर हे दोन्ही पदार्थ एकत्र करून खाण्याचं धाडस केलेलं नव्हतं (How to make water melon popcorn?). पण नेमकं असंच काहीसं अजब- गजब पद्धतीने करण्यात आलं आणि त्यातून तयार झाले टरबूज पॉपकॉर्न.(tarbuj popcorn)

 

हा व्हिडिओ ट्विटरच्या@KaptanHindostan या पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये पॉपकॉर्न तयार होण्याची म्हणजेच लाह्या फुटण्याची जी क्रिया दाखविण्यात आली आहे, ती अतिशय मस्त आहे. पण नेटकऱ्यांना मात्र एवढाच प्रश्न पडला आहे की हे दोन्ही वेगवेगळे पदार्थ अशा पद्धतीने एकत्र करून खाण्यात काय मजा... व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की तेलाने भरलेली एक मोठी कढई तापायला ठेवली आहे. कढईतलं तेल तापल्यानंतर त्यात टरबूजाची एक मोठी फोड टाकण्यात आली. हळूहळू टरबूज तेलात तापत गेलं आणि टरबुजाचा रंग तेलात उतरून तेल टरबुजाप्रमाणे लाल- गुलाबी दिसू लागलं.

 

यानंतर मग त्या व्यक्तीने मक्याचे दाणे असणारं एक पाकीट फोडलं आणि ते अख्खं पाकीट तेलात टाकून दिलं. यानंतर हळूहळू मक्याच्या दाण्याच्या लाह्या फुटत गेल्या आणि बघता बघता सगळी कढई पॉपकॉर्नने भरून गेली. टरबूजाचा रंग तेलात उतरल्यामुळे पॉपकॉर्नवरही मस्त हलका गुलाबी रंग चढलेला दिसतोय.. आता हे पॉपकॉर्न चवीला कसे झाले असतील, याचा तर काही अंदाज लावता येत नाही. पण तुम्हाला जर ही रेसिपी पाहून टरबूज पॉपकॉर्न हे नवं कॉम्बिनेशन खाऊन बघण्याची इच्छा झाली असेल, तर घरच्या घरीही हा प्रयोग करता येईल. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलअन्नपाककृतीट्विटर