Join us  

ऐकली होती का कधी सफरचंदाची इडली? हा विचित्र प्रयोग पाहून नेटिझन्स हैराण, बघा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2023 11:46 AM

Viral Video Of Making Apple Idli: सफरचंदाची इडली हा नवाच प्रकार सध्या सोशल मिडियावर गाजतो आहे... तुम्ही हा इडलीचा प्रकार कधी ऐकला होता का? (Have you heard apple idli recipe)

ठळक मुद्देबघा आता ही रेसिपी आवडली असेल तर ॲपल इडलीचा हा प्रयोग तुम्ही घरीही करू शकता. 

अन्नपदार्थांमध्ये प्रयोग करावेच लागतात. त्याशिवाय वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती होत नाही आणि चवीमध्ये बदल येत नाही. पण म्हणून चवीमध्ये बदल करण्यासाठी किंवा प्रयोग करायचा म्हणून ॲपल इडली किंवा सफरचंदाची इडली असं काही भलतंच (Weird Food combinations) लोक करायला लागले तर मात्र ते इडली प्रेमींची नाराजी ओढवून घेण्याचंच काम आहे (Have you heard apple idli recipe). असंच काम सध्या एका शेफने केलं असून ॲपल इडली किंवा सफरचंदाची इडली हा भलताच विचित्र प्रयोग पाहून नेटकरी जाम वैतागले आहेत. तो व्हिडिओ पाहून "5000 south Indians got heartattack just by watching this..." अशी मजेशीर प्रतिक्रियाही एकाने दिली आहे. (Viral video of making apple idli)

 

ॲपल इडली म्हणजे नेमकं काय?

नाव वाचून हा प्रश्न बहुतेकांना पडलेलाच आहे. thegreatindianfoodie या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ बहुतेक मुंबईच्याच एखाद्या स्ट्रीटफूड स्टॉलवरचा असावा, असा अंदाज व्हिडिओला दिलेल्या हॅशटॅगवरून दिसून येते. आता पाहूया हा ॲपल इडलीचा प्रयोग नेमका केला कसा....

आलियाप्रमाणेच आता सारा अली खाननेही घातला जुना ड्रेस- बघा नेमकं काय सांगतोय हा नवा ट्रेण्ड

ॲपल  इडली हा प्रयोग करण्यासाठी त्या शेफने सफरचंद आणि इडली हे दोन पदार्थ एकत्र आणले आहेत. काही इडलीप्रेमींना हा प्रयोग आवडू शकतो. तर काहींना या प्रयोगाचा रागही येऊ शकतो. 

 

सगळ्यात आधी तर त्या शेफने सफरचंदाच्या फोडी करून घेतल्या.

त्यानंतर त्या फोडी इडलीच्या पिठात कालवल्या आणि त्या पिठाच्या इडल्या लावल्या.

कुंडीतल्या मातीला बुरशी आली- किडे झाले? १ सोपा उपाय, मातीतलं इन्फेक्शन दूर होईल- झाडं जोमात वाढतील

इडली झाल्यानंतर त्या इडलीवर पुन्हा सफरचंदाची फोड ठेवली आणि काही डाळिंबाचे दाणे टाकून ती इडली वेगवेगळ्या चटण्यांसोबत सर्व्ह केली. 

बघा आता ही रेसिपी आवडली असेल तर ॲपल इडलीचा हा प्रयोग तुम्ही घरीही करू शकता. 

 

टॅग्स :अन्नसोशल व्हायरलव्हायरल फोटोज्