आपल्याला मान्य आहे की प्रत्येक घरची स्वयंपाक करण्याची स्टाईल वेगवेगळी असते. त्यामुळेच तर प्रत्येक घरच्या प्रत्येक पदार्थाची चव वेगळी लागते. स्वयंपाक करताना बऱ्याचदा वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करून पाहाव्या लागतात. तसं केल्यानेच मग वेगवेगळ्या चवदार रेसिपी जन्माला येतात. पण फक्त प्रयोगाच्या नावाखाली दोन अतिशय भिन्न असणारे पदार्थ एकत्र आणले जात असतील, तर ते मात्र अनेक खवय्यांना अजिबात मान्य नाही (Women make pakoda from kajukatli). याचंच एक उदाहरण पाहायचं असेल तर काजुकतलीची भजी करण्याचा हा व्हायरल व्हिडिओ पाहा.... (have you ever heard kajukatli pakoda or bhaji)
काजुकतली कशी गोडमटक असते. त्याउलट भजी तिखट, खमंग आणि चवदार. आता गोड आणि तिखट या पुर्णपणे दोन वेगवेगळ्या आणि परस्पर विरोधी चवी म्हटल्या तरी चालतील. आता एका महिलेने मात्र याच दोन पदार्थांना आणि त्यांच्या वेगवेगळ्या चवींना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. Mohammed Futurewala या सोशल मिडिया हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये एक महिलेने एका भांड्यात भजी करण्याचं पीठ भिजवलं आहे आणि तिच्या शेजारी काजुकतलीचं पाकिट ठेवलं आहे.
ती चक्क काजुकतली उचलते, बेसन पिठात चांगली घोळून घेते आणि नंतर कढईमधल्या तापत्या तेलामध्ये तळायला सोडून देते. तिचा हा अतरंगी प्रयोग पाहून अनेकांनी डोक्याला हात मारुन घेतला आहे. काजुकतली लव्हर आणि भजी लव्हर यांना त्यांच्या आवडीच्या पदार्थांची अशी सरमिसळ अजिबातच आवडलेली नाही. तर काही खवय्यांनी मात्र चवीत थोडासा बदल म्हणून हा पदार्थ खाऊन पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बघा आता तुम्हालाही व्हिडिओ पाहून काजुकतली भजी नावाचा हा पदार्थ खावा वाटला तर रेसिपी नक्की ट्राय करून पाहा.