आजकाल प्री वेडींग शूटचा क्रेझ खूपच वाढलाय. प्रत्येक जोडप्यासाठी लग्नाचा दिवस खूप खास असतो. लग्नाच्या शूटसाठी स्टंट करणारी जोडपी सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात. अशा स्थितीत लग्न करणारी जोडपी फोटोशूटसाठी एखादे ऐतिहासिक ठिकाण, उद्यान, डोंगर, धबधबा किंवा समुद्रकिनारा अशी सुंदर जागा निवडतात. बरेचदा लोक काहीतरी वेगळे प्रयोग करतात. नुकताच असाच एक प्री-वेडिंग शूटचा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये वधू-वर त्यांच्या विचित्र पोझमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. (Weird photoshoot groom standing on his head in frant of bride pre wedding photoshoot)
Pre wedding shoot कठिन होता जा रहा है, अच्छा हुआ अपन पहले ही निपट गये😃 pic.twitter.com/kzEKHtKi7H
— Hasna Zaroori Hai (@HasnaZarooriHai) November 4, 2022
नुकतेच व्हायरल झालेले हे विचित्र प्री-वेडिंग शूट आजकाल इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरलंय. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचेही डोके एक मिनिटासाठी चक्रावेल. व्हिडिओमध्ये वर 'शिर्षासन' करत आहे, तर वधू भरतनाट्यम स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. व्हिडिओ पाहून असा अंदाज वर्तवला जात आहे की तो दक्षिण भारतातील असावा, जिथे हे फोटोशूट एका मंदिरात करण्यात आले आहे. यादरम्यान वधू भरतनाट्यमची वेगवेगळी पोझ करताना दिसत आहे.
'ते क्षण मला कठीण दिवसात..' सानिया-शोएब होणार वेगळे? त्या सोशल मीडिया पोस्टनं खळबळ
त्याच वेळी, वर एकाच पोझमध्ये हेडस्टँड करताना दिसत आहे. काही वेळापूर्वी, केरळमधील एका वधूने रस्त्यांवरील पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्ये तिच्या लग्नाचे शूट केले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @HasnaZarooriHai नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
व्हिडिओ शेअर करताना, कॅप्शनमध्ये मजेशीरपणे लिहिले आहे, 'प्री वेडिंग शूट अधिक कठीण होत आहे, आम्ही आधीच सेटल झालो आहोत.' हा व्हिडिओ आतापर्यंत 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला 12 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रकारच्या विचित्र प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, 'आजकाल प्री-वेडिंग फोटोशूटच्या नावावर काहीही चालले आहे.'