Lokmat Sakhi >Social Viral > तब्बल १ किलो वजनाचं सुरत स्पेशल रिमझिम सॅण्डविच! बघा जंबो सॅण्डविचचा व्हायरल व्हिडिओ

तब्बल १ किलो वजनाचं सुरत स्पेशल रिमझिम सॅण्डविच! बघा जंबो सॅण्डविचचा व्हायरल व्हिडिओ

Rimzim sandwich Recipe: सुरतला कधी गेलात, तर तिथलं हे प्रसिद्ध रिमझिम सॅण्डविच खायला विसरू नको. एवढं मोठं सॅण्डविच बघूनच हैराण व्हाल...(Surat special Rimzim sandwich)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2022 05:44 PM2022-08-24T17:44:47+5:302022-08-24T17:48:45+5:30

Rimzim sandwich Recipe: सुरतला कधी गेलात, तर तिथलं हे प्रसिद्ध रिमझिम सॅण्डविच खायला विसरू नको. एवढं मोठं सॅण्डविच बघूनच हैराण व्हाल...(Surat special Rimzim sandwich)

What a big sandwich!! Viral video of Surat special Rimzim sandwich, Must watch hatke sandwich recipe  | तब्बल १ किलो वजनाचं सुरत स्पेशल रिमझिम सॅण्डविच! बघा जंबो सॅण्डविचचा व्हायरल व्हिडिओ

तब्बल १ किलो वजनाचं सुरत स्पेशल रिमझिम सॅण्डविच! बघा जंबो सॅण्डविचचा व्हायरल व्हिडिओ

Highlightsरिमझिम सॅण्डविच करण्यासाठी साधारण एखाद्या पोळीएवढे मोठे असणारे गोलाकार ब्रेड वापरले आहेत.

सॅण्डविच हा अनेक जणांचा आवडीचा पदार्थ. दोन- तीन ब्रेडच्या स्लाईस एकमेकांवर ठेवायच्या, त्यांच्यामध्ये आपल्याला हवं ते स्टफिंग घालायचं. पाहिजे तर ग्रील करायचं, नाहीतर मग तसंच खायचं.. असा सॅण्डविचचा सोपा, सुटसुटीत प्रकार (How to make sandwich?) आपल्याला माहिती असतो. पण सध्या सोशल मिडियावर जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात तब्बल १ किलो वजनाचं आणि १२०  रुपये किंमत असलेलं भलं मोठं सॅण्डविच (big/ jumbo sandwich) दिसत आहे. या सॅण्डविचचं नावही मोठं मजेदार असून ते गुजरातच्या सुरत शहरात (Surat, Gujarat) रिमझिम सॅण्डविच  म्हणून ओळखलं जातं. हे रिमझिम सॅण्डविज (Viral video of Rimzim sandwich) कसं तयार केलं जातं, त्याचा हा रंजक व्हिडिओ एकदा बघाच..

 

रिमझिम सॅण्डविच करण्याची रेसिपी
- foodie_incarnate या इन्स्टाग्राम पेजवरून ही रेसिपी शेअर करण्यात आली आहे. जर तुम्हाला चीज आणि बटर भरपूर खायला आवडत असेल, तर हे सॅण्डविच तुम्हाला नक्की आवडू शकतं. 

केसांना मजबूत करणारे ५ घटक, हे पदार्थ आहारात नसतील तर केस गळणारच, म्हणूनच आहारात घ्या......
- रिमझिम सॅण्डविच करण्यासाठी साधारण एखाद्या पोळीएवढे मोठे असणारे गोलाकार ब्रेड वापरले आहेत.
- सगळ्यात आधी एका ब्रेड स्लाईसला बटर, हिरवी चटणी लावून घेतली. त्यावर शेजवान सॉस टाकला. त्यावर मसाला लावून तयार केलेल्या अनेक भाज्या टाकल्या. त्यावर एक ब्रेड ठेवला ज्याला बटर आणि हिरवी चटणी लावलेली होती.


- आता त्या ब्रेडवर भरपूर चीज किसून टाकलं. त्यावर पुन्हा मेयोनिज टाकलं. त्यावर पुन्हा मसाला असलेल्या भाज्या घातल्या. या दुसऱ्या टप्प्यासाठी प्लेन मेयोनिजऐवजी तंदुरी मेयाेनिज वापरलं. त्यावर पुन्हा भरपूर चीज किसून टाकलं.

कतरिना कैफचं फिटनेस सिक्रेट! फिट राहण्यासाठी पिते खास स्मुदी, बघा तिने सांगितलेली स्पेशल रेसिपी 
- अशा पद्धतीने एकावर एक ३ ब्रेड चढवण्यात आले. सगळ्यात शेवटच्या ब्रेडवर आणखी एकदा भरपूर बटर आणि चीज टाकलं. त्यावर ओरिगॅनो आणि चिलीफ्लेक्स टाकून ते ५ मिनिटांसाठी ओव्हनमध्ये बेक करायला ठेवलं. बेक झाल्यानंतर हे सॅण्डविच पिझ्झाप्रमाणे ६ तुकड्यांत कापलं आणि सर्व्ह केलं. 
- रेसिपी आवडली असेल तर सुरतला गेल्यानंतर हे सॅण्डविज खायला विसरू नका. 

 

Web Title: What a big sandwich!! Viral video of Surat special Rimzim sandwich, Must watch hatke sandwich recipe 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.