Lokmat Sakhi >Social Viral > कसली धीट पोर! चिमूकल्या मुलीनं सापाला शेपटीला धरुन सर्रकन खेचले आणि... पाहा व्हायरल व्हिडिओ

कसली धीट पोर! चिमूकल्या मुलीनं सापाला शेपटीला धरुन सर्रकन खेचले आणि... पाहा व्हायरल व्हिडिओ

Viral Video of a Girl Playing with Big Snake at Home : आता हा साप बाहेरचा आहे की पाळलेला असा प्रश्नही कदाचित हा व्हिडिओ पाहून आपल्याला पडू शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2022 04:34 PM2022-09-08T16:34:29+5:302022-09-08T16:46:22+5:30

Viral Video of a Girl Playing with Big Snake at Home : आता हा साप बाहेरचा आहे की पाळलेला असा प्रश्नही कदाचित हा व्हिडिओ पाहून आपल्याला पडू शकतो.

What a brave boy! The little girl grabbed the snake by its tail and dragged it... Watch the viral video | कसली धीट पोर! चिमूकल्या मुलीनं सापाला शेपटीला धरुन सर्रकन खेचले आणि... पाहा व्हायरल व्हिडिओ

कसली धीट पोर! चिमूकल्या मुलीनं सापाला शेपटीला धरुन सर्रकन खेचले आणि... पाहा व्हायरल व्हिडिओ

Highlightsहा साप किती जाड आणि मोठा आहे हे आपल्याला त्याला पाहून समजते. व्हिडिओला कॅप्शन देताना बहुदा तिला झोपायचे असावे अशा आशयाचे कॅप्शन देण्यात आले आहे.

साप म्हटले की आपल्याला ऐकूनच भिती वाटते, सापाच्या जवळ जाणे वगैरे तर दूरच. पण काही जण इतके शूर असतात की त्यांना साप, हिस्र प्राणी अशा कोणत्याच गोष्टींची भिती वाटत नाही. सोशल मीडियावरही अनेकदा अशाप्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात आणि आपण ते पाहून आश्चर्य व्यक्त करतो. इतके डेअरींग यांच्याकडून येते कुठून असा प्रश्नही अनेकदा आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही. असाच एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये एक लहानगी मुलगी एका मोठ्या काळ्या रंगाच्या सापाला शेपटीला धरुन खेचत असल्याचे दिसते. आता हा साप बाहेरचा आहे की पाळलेला असा प्रश्नही कदाचित हा व्हिडिओ पाहून आपल्याला पडू शकतो. कारण ती मुलगी ज्या सहजतेने सापाला हाताळत आहे त्यावरुन तिला याची सवय असावी असे वाटते (Viral Video of a Girl Playing with Big Snake at Home).

(Image : Google)
(Image : Google)

 

६ ते ७ वर्षे वयाची असलेली ही लहानगी अगदी सहज या सापाच्या शेपटीला धरुन त्याला ओढत असल्याचे दिसते. ती जितका जोर लावून त्याला ओढते तितक्याच वेगाने तो साप पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. हे दृश्य घरातील असल्याचेही आपल्याला व्हिडिओ पाहून समजते. इतकेच नाही तर ही खोली या लहान मुलीचीच असावी असा अंदाजही येतो. कारण या खोलीत मोठ्या प्रमाणात खेळणी दिसतात. हा साप बेडच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही लहानगी त्याला मागे खेचते. मग हा साप गादीच्या आतल्या बाजूला जायचा प्रयत्न करतो. कदाचित त्यालाही गार लागत असेल आणि गादीवर असलेल्या ब्लॅंकेटची ऊब त्यालाही हवी असेल. 

Snakemasterexotics या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून एरीयाना नावाच्या मुलीचा हा चॅनल आहे असे म्हटले जाते. व्हिडिओला कॅप्शन देताना बहुदा तिला झोपायचे असावे अशा आशयाचे कॅप्शन देण्यात आले आहे. आता यामध्ये मुलीला झोपायचे आहे असे म्हणायचे आहे की सापाला हे मात्र स्पष्ट होत नाही. हा साप किती जाड आणि मोठा आहे हे आपल्याला त्याला पाहून समजते. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून हजारो जण तो पाहत आहेत आणि काही जण त्यावर आपल्या प्रतिक्रिय़ाही व्यक्त करत आहेत. एरीयानाचा अशाप्रकारे सापाशी खेळतानाचा व्हायरल झालेला हा पहिलाच व्हिडिओ आहे असे नाही. तर या आधीही तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. 
 

Web Title: What a brave boy! The little girl grabbed the snake by its tail and dragged it... Watch the viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.