Join us  

बघा तिची हिंमत! वाघासोबत केलं डेंजर फोटोसेशन, ते पाहूनच नेटिझन्स म्हणाले.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2022 12:39 PM

Viral Video Of a Woman And Tiger: एखाद्या वन्य प्राण्यासोबत अशा पद्धतीने फोटोसेशन करणं, खरोखरच धोकादायक ठरू शकतं. या व्हिडिओमधली एक तरुणी नेमकं तेच करते आहे.

ठळक मुद्देवाघासारख्या हिंस्त्र वन्य प्राण्यासोबत एका तरुणीने अशा पद्धतीने केलेलं फोटोसेशन पाहून अनेक जण हैराण झाले आहेत. 

सोशल मिडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल (viral video) होत असतात. त्यातले काही व्हिडिओ खरोखरच अतिशय क्रिएटिव्ह आणि बघण्यासारखे असतात, काही व्हिडिओ विनाेदी तर काही अगदीच टाईमपास व्हिडिओ असतात. सध्या व्हायरल झालेला एक व्हिडिओ मात्र चांगलाच घाबरवून सोडणारा आहे. वाघासारख्या हिंस्त्र वन्य प्राण्यासोबत एका तरुणीने अशा पद्धतीने केलेलं फोटोसेशन (photoshoot of a woman with tiger) पाहून अनेक जण हैराण झाले आहेत. 

 

tiger__bigfan या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. Tigers are trained to raise from a young age असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. या पेजवर शेअर करण्यात आलेल्या जवळपास सगळ्याच फोटोंमध्ये वाघ असून विविध भागांतील tiger lovers या पेजला कनेक्ट झाले आहेत.

फिट राहण्यासाठी रोज करा वृक्षासन, अभिनेत्री भाग्यश्रीही करतेय हे योगासन! वृक्षासनाचे फायदे ५

वेगवेगळ्या फोटो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून वाघ अणि माणसांमधला सुंदर बॉण्ड दाखविण्याचा प्रयत्न या पेजद्वारे करण्यात आला आहे. आता सध्या आपण जो व्हिडिओ बघतो आहोत, तो नेमका कोणत्या देशातला आहे, याची माहिती उपलब्ध नाही. पण हा व्हिडिओ मात्र अनेक जणांना आवडला असून बरेच जण तर तो पाहून घाबरूनही गेले आहेत.

 

या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की एका तरुणीने वाघासोबत फोटो काढण्यासाठी एक डेंजर पोझ दिली आहे. त्यासाठी ती लॉनवर पालथी झोपली असून तिच्या पाठीवर वाघ आहे.

साऊथच्या लोकप्रिय अभिनेत्याच्या पत्नीचा पलाओ डाएटमुळे मृत्यू झाल्याची चर्चा, नेमके असते काय हे डाएट?

वाघाने चारही बाजूंनी तिला पुर्णपणे घेरले असून तिच्या बरोबर डोक्यावर वाघाचे डोके आहे. फोटो काढताना वाघ जरा चुळबूळही करत आहे. पण ती तरुणी मात्र एकदम बिंधास्त असून जराशीही भीती तिच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये. काही जणांना हा फोटो मनापासून आवडला असून काही जण मात्र फोटो पाहूनच घाबरून गेले आहेत. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलवाघ