एकमेकांवर भरभरून प्रेम करणारी अनेक तरुण जोडपी आपण नेहमीच आजुबाजुला पाहतो. तारुण्यात या प्रेमाचं खुलेपणाने प्रदर्शनही (expressing love) केलं जातं. पण वय जसजसं वाढत जातं, तसतसं मात्र प्रेम व्यक्त करणं कुठेतरी कमी- कमी होत जातं. चारचौघांत तर ते हमखास टाळलंच जातं. या वयात जर आपण आपलं प्रेम दाखवलं तर ''लोक काय म्हणतील'', ही एक भीतीही त्यामागे असतेच.. पण असं जगाला घाबरण्यापेक्षा मनात प्रेम असेल तर तुमच्या जोडीदारासमोर ते व्यक्त करायला काय हरकत आहे... असंच काहीसं सांगत आहेत सध्या सोशल मिडियावर व्हायरल झालेले हे एक रोमॅण्टिक आजोबा..(old age ramance)
आपल्या जोडीदाराविषयीचं प्रेम व्यक्त करण्याची एक खास पद्धत आपण नेहमीच चित्रपटांमधून किंवा मालिकांमधून पाहत आलो आहेत. ते म्हणजे मुलाने गुडघे टेकवून मुलीसमोर बसायचं आणि त्याचं प्रेम तिच्याकडे व्यक्त करायचं. आजकाल तर तरुण मुलं आपल्या प्रेयसीला प्रपोज करताना किंवा साखरपुड्यात होणाऱ्या बायकोला अंगठी घालतानाही असंच करतात. असंच काहीसं करावं वाटलं या एका सदाबहार आजाेबांना. त्यांच्या लग्नाच्या ४४ व्या वाढदिवशी त्यांनी धडपडत का होईना पण गुडघ्यांवर बसून बघितलंच आणि त्यांच्या पत्नीला एक छानसा गुलाब दिलाच..
इन्स्टाग्रामच्याpragyajaingoley या पेजवरून हा एक छानसा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आजवर चांगलाच व्हायरल झाला आजवर त्याला हजारो लाईक्स मिळाले आहेत. यामध्ये असं दिसत आहे की एका वृद्ध दाम्पत्याच्या लग्नाची ४४ वी ॲनिव्हर्सरी आहे. या दिवसानिमित्त आजोबांना गुडघ्यांवर बसून त्यांच्या बायकोजवळ प्रेम व्यक्त करायचं आहे. खरं तर आजोबा खूपच थकले आहेत.
पावसाळ्यात कपडे वाळत नाही म्हणून कुणी 'असं' करतं का? पहा मुंबईकरांची कमाल.. व्हिडिओ व्हायरल
त्यामुळे त्यांना सहजासहजी गुडघ्यावर बसता येईना. ते खूप प्रयत्न करत आहेत, पण तरी जमेना. शेवटी एक तरुण त्यांच्या मदतीला येतो आणि त्यांना गुडघ्यावर बसण्यासाठी मदत करतो. यानंतर आजोबा स्वत:जवळचं गुलाबाचं फुल अगदी प्रेमळपणे त्यांच्या पत्नीला देतात. याही वयात प्रेम व्यक्त करण्याची आजोबांची ही धडपड नेटकरींना भारीच आवडली असून हे प्रत्येक जण त्यांच्या प्रेम व्यक्त करण्याच्या या अनोख्या स्टाईलचं भरभरून कौतूक करत आहे.