चुलबुली अभिनेत्री काजोल (Kajol) आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. तिने आपल्या अभिनयातून अनेक दशकं सिनेसृष्टी गाजवली. फक्त चित्रपट नसून, वेब सिरीजच्या दुनियेतही तिने आपला जलवा दाखवला आहे. ती आपल्या फॅशन स्टेंटमेंटसाठीही ओळखली जाते. ती कधी साडी तर, कधी वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसून येते. काजोलसोशल मीडियात प्रचंड सक्रीय असते. ती आपले डे टू डे अपडेट सोशल मीडियात शेअर करते. तिने नुकतंच आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त (International Mountain Day) शुभेच्छापर एक पोस्ट शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये काजोल पर्वत रांगेत उभी दिसत असून, तिने ट्रेकर्सचे कपडे परिधान केले आहे. मात्र, नेटकऱ्यांचं लक्ष तिने घातलेल्या सॉक्स आणि पोस्टच्या कॅप्शनकडे आहे. तिने घातलेला हा सॉक्स सामान्य नसून (Leech Socks), तिच्या पायांचे किड्यांपासून पुरेपूर सरंक्षण करत आहे. दरम्यान, लीच सॉक्स म्हणजे काय? त्याची एवढी चर्चा का? (Social Viral) या सॉक्सची नेमकी खासियत काय? पाहूयात(What are leech socks? Kajol's wears leech socks while trekking, check out what does it means..).
'गेलेला पैसा मी परत कमवू शकते, पण आई..' गरीबीतले दिवस आठवून लाफ्टर क्वीन भारती सांगते..
काजोलने घातलेले लीच सॉक्स म्हणजे काय?
काजोलने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये काजोल सुंदर, हिरव्यागार पर्वतरांगेत उभी आहे. मागचा नजारा हा खरंच पाहण्यासारखा आहे. तिने ब्लॅक कलरच्या टी शर्टवर, ब्लॅक रंगाची पॅन्ट घातली आहे. शिवाय गॉगलही या ड्रेसवर उठून दिसत आहे. मुख्य म्हणजे सगळ्यांच्या नजरा या तिच्या सॉक्सवर आहेत. तिने या कपड्यांवर सामान्य सॉक्स नसून, लीच सॉक्स घातले आहे. शिवाय तिने पोस्टच्या कॅप्शनमध्येही लीच सॉक्सचा उल्लेख केला आहे. तिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'लीच सॉक्स म्हणजे काय? हे आपल्याला ठाऊक आहे का? चला तर मग या मौल्यवान इकोसिस्टमचे सरंक्षण करण्यासाठी सर्वजण पुढाकार घेऊयात.'
लीच सॉक्स हा नवा प्रकार काय?
कीटक यासह जळूपासून पायांचे सरंक्षण करण्यासाठी लीच सॉक्सचा वापर होतो. कारण बऱ्याचश्या डोंगराळ भागांमध्ये जळू यासह विविध प्रकारचे कीटक असतात. जे नकळत आपल्या पायाचा चावा घेतात. ज्यामुळे आपल्या पायांना इजा होऊ शकते. लीच सॉक्स घातल्याने पायांना कोणतेही कीटक चिटकू किंवा चावू शकत नाही. कारण त्याचे कापड इतर सॉक्सच्या तुलनेत वेगळे असते. हे सॉक्स गुडघ्यांपर्यंत आपल्या पायांचे रक्षण करते. पायांचे कीटकांपासून सरंक्षण करायचे असेल तर, लीच सॉक्सचा वापर नक्की करा. याचा अधिक वापर ट्रेकर्ससाठी फायदेशीर ठरू शकते.