Join us  

लोलो आणि बेबो म्हणजे काय? करिश्माला 'लोलो' आणि करिनाला 'बेबो' का म्हणत असतील...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2022 3:52 PM

लोलो आणि बोबो या दोन्ही शब्दांचा अर्थ काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर करीनाने एका मुलाखतीत आपल्या आणि करिष्माच्या नावाचा अर्थ सांगितला आहे.

ठळक मुद्देही दोन्ही नावे इतकी प्रसिद्ध झाली की या दोन्ही बहिणींना आजही याच नावाने ओळखले जाते. सैफ अली खानही करीनाला अनेकदा तिच्या या टोपण नावानेच हाक मारतो. माझं बेबो हे नाव माझे बाबा रणधीर कपूर यांनी लाडाने ठेवलं आहे.

आपल्या प्रत्येकाचे एक नाव असले तरी घरात आपल्याला एका वेगळ्या नावाने हाक मारत असतात. या नावाला आपण पेट नेम किंवा मराठीत लाडाचे नाव म्हणतो. आपण कितीही मोठे झालो तर आपल्या घरातील आणि जवळचे लोक आपल्याला खऱ्या नावाने हाक मारण्याऐवजी याच नावाने हाक मारतात. आपल्यालाही या नावाने कोणी हाक मारली की अगदी आपलेसे वाटते. आपल्याप्रमाणेच अभिनेते आणि अभिनेत्रींनाही त्यांच्या घरात लाडाने हाक मारली जाते. प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) हिला बेबो (Bebo) म्हणत असल्याचे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. इतकेच नाही तर तिची मोठी बहिण आणि अभिनेत्री असलेल्या करिष्मालाही (Karishma kapoor) प्रेमाने लोलो (Lolo) म्हणतात. आता लोलो आणि बोबो या दोन्ही शब्दांचा अर्थ काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर करीनाने एका मुलाखतीत आपल्या आणि करिष्माच्या नावाचा अर्थ सांगितला आहे (Meaning of Bebo and Lolo). 

(Image : Google)

करीना म्हणते बेबो आणि लोलो या दोन्ही नावांना तसा काही फार खास अर्थ नाही. पण माझं बेबो हे नाव माझे बाबा रणधीर कपूर यांनी लाडाने ठेवलं आहे. करिष्माला लोलो म्हणत असल्याने त्याच्याशी मिळते-जुळते व्हावे म्हणून माझे नाव बेबो ठेवल्याचे ती सांगते. माझे आई आणि बाबा यांना आमच्या दोघींची टोपण नावे थोडी फनी ठेवायची होती. करिष्माच्या लोलो नावाला थोडा तरी अर्थ आहे पण माझ्या बेबोला तर काहीच अर्थ नाही असे ती म्हणते. पण आता बेबो हे नाव तिच्या घरातच नाही तर बॉलिवूड इंडस्ट्रीतही प्रसिद्ध झाले. सुरुवातीला बॉलिवूडमध्ये तिचे नाव बेबो आहे हे कोणालाच माहित नव्हते. पण करिना आपल्या अभिनयाच्या जोरावर जशी प्रसिद्ध होत गेली तसे इंडस्ट्रीतील लोकांबरोबरच तिचे फॅन्सही तिला बेबो नावाने ओळखायला लागले. त्यामुळे बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री असूनही बेबो हे नाव तिचे टोपण नावच जास्त वापरले जाते. 

(Image : Google)

लोलोचा अर्थ सांगताना करिना म्हणते. आम्ही सिंधी असल्याने आमच्याकडे सिंधी भाषेत गोड पोळी किंवा गोड रोटीला मिठी लोली म्हणतात. या लोलीवरुन तिला लोलो असे म्हटले जायला लागले. मग माझ्या जन्मानंतर माझे आणि तिचे पेट नेम यामध्ये रायमिंग असावे म्हणून माझे नाव बोबो ठेवले. पुढे ही दोन्ही नावे इतकी प्रसिद्ध झाली की या दोन्ही बहिणींना आजही याच नावाने ओळखले जाते. सैफ अली खानही करीनाला अनेकदा तिच्या या टोपण नावानेच हाक मारतो. करिनाच्या दोन्ही मुलांच्या नावांबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. तैमूरच्या नावावरुन अनेकांनी करिना आणि सैफ अली खानला ट्रोल केलं होतं. त्यामुळे दुसऱ्या मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याचा चेहरा तिने माध्यमांसमोर अजिबात येऊ दिला नव्हता. इतकंच नाही तर त्याचं नावही या दोघांनी गुलदस्त्यात ठेवलं होतं. अखेर ते नाव जेह असल्याचं जाहीर करण्यात आलं.