सगळ्या भांड्यांपैकी किचनमधील प्रेशर कुकर ही रोजच्या वापरातील एक महत्वाची वस्तू आहे. डाळ, भात, भाजी, आमटी यापैकी कोणताही पदार्थ तयार करायचा म्हटलं की प्रेशर कुकर (Cleaning Tips For Your Pressure Cooker) वापरतो. रोजच्या कामाच्या गडबडीत झटपट कमी वेळात स्वयंपाक करणे हा खूप मोठा टास्क असतो. वेळ आणि गॅसची बचत व्हावी यासाठी आपण शक्यतो प्रेशर कुकरचा वापर करतो. बटाटे उकडवण्यापासून ते डाळ शिजवण्यापर्यंत प्रेशर कुकरचा (Tips for Cleaning Pressure Cookers) वापर करून अशा अनेक गोष्टी अगदी झटपट करता येतात. यामुळेच प्रेशर कुकर हा रोज वापरला जात असल्याने त्याच्या स्वच्छतेची काळजी घेणे देखील तितकेच महत्वाचे असते(What are the 3 major parts of a pressure cooker should always clean).
कुकर रोज वापरुन झाल्यावर आपण तो धुतो खरा, परंतु कुकर स्वच्छ होण्यासाठी फक्त आतून - बाहेरुन साबण पाणी लावून धुणे इतकेच महत्वाचे नसते. तर कुकरची आतून - बाहेरून खोलवर स्वच्छता करणे तितकेच गरजेचे असते. कुकर आपण नेहमी स्वच्छ धुवून साफ तर करतोच पण कुकरमधील अशा काही छुप्या जागा असतात ज्या नकळतपणे स्वच्छ (Cleaning Tips For Your Pressure Cooker) करणे आपल्याकडून राहून जाते. याचबरोबर, कुकर स्वच्छ करताना आपण साबण किंवा, लिक्विड डिशवॉश लावून स्वच्छ घासून धुतो परंतु अशा काही छुप्या जागा असतात ज्या साफ करणे आपण विसरतो, यामुळे कुकरची पूर्ण सफाई होऊ शकत नाही. कुकरमधील अशा कोणत्या त्या जागा आहेत ते पाहूयात.
कुकर स्वच्छ करताना लक्षात ठेवा...
१. झाकणावरील एक्झॉस्ट व्हॉल्व्ह :- कुकरच्या झाकणावर एक लहान छिद्र असते, ज्यातून हवा बाहेर पडते. हाच एक्झॉस्ट व्हॉल्व्ह रोजच्या रोज स्वच्छ करताना आपले त्याकडे दुर्लक्ष होते. या एक्झॉस्ट व्हॉल्व्हच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणे अतिशय गरजेचे असते. काहीवेळा प्रेशर कुकरमध्ये डाळ, भातासारखे अन्नपदार्थ शिजवताना ते या एक्झॉस्ट व्हॉल्व्हमध्ये जाऊन चिकटून बसतात. परिणामी, आतील गरम वाफ बाहेर पडत राहते आणि यामुळेच आत प्रेशर तयार होऊ शकत नाही. यामुळे अन्नपदार्थ नीट शिजत नाहीत किंवा शिजायला जास्त वेळ लागतो. अशा परिस्थितीत रोजच्या रोज प्रेशर कुकर धुताना हा कुकरच्या झाकणावर असलेला लहानसा एक्झॉस्ट व्हॉल्व्ह स्वच्छ करायला विसरू नये. या एक्झॉस्ट व्हॉल्व्हमध्ये चिकटलेले अन्नपदार्थ वेळच्यावेळीच काढून स्वच्छ करावेत. जर तुम्ही हा एक्झॉस्ट व्हॉल्व्ह वेळीच स्वच्छ केला नाही तर त्याजागी जीवाणू वाढण्याची आणि वाफ सतत बाहेर पडत राहिल्याने अन्नपदार्थ उशिरा शिजतील यामुळे स्वयंपाक करण्यास वेळ जास्त लागतो आणि गॅसचा वापर देखील जास्त प्रमाणात होतो.
स्वयंपाकाच्या गॅसची करा बचत, फक्त विकत आणा 'ही' वस्तू; गॅस लवकर संपणार नाही...
२. कुकरच्या झाकणाची आतील बाजू :- शक्यतो कुकर स्वच्छ करताना आपण कुकर धुतो परंतु कुकरच्या झाकणाच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेत नाही. यासाठी कुकर सोबतच कुकरच्या झाकणाची देखील वेळीच योग्य ती स्वच्छता करणे गरजेचे असते. कुकरच्या झाकणाला जो रबर असतो त्या रबरच्या फटीत अन्नपदार्थ जाऊन अडकतात तसेच अन्नकण चिकटून बसतात. अशावेळी कुकरचे झाकण आणि त्याची रबरी रिंग काढून त्याचे झाकण स्वच्छ धुतले पाहिजे.
३. कुकरच्या तळाचा पृष्ठभाग :- कुकर स्वच्छ करताना त्याच्यासोबतच कुकरच्या तळाशी असलेला पृष्ठभाग देखील स्वच्छ करणे तितकेच महत्वाचे असते. कुकरच्या तळाचा पृष्ठभाग आतून - बाहेरून दोन्ही बाजूंनी स्वच्छ करावा. काहीवेळा कुकरमध्ये अन्नपदार्थ शिजवताना ते कुकरच्या तळाशी जाऊन चिकटतात किंवा कुकरचा पृष्ठभाग करपतो. अशावेळी कुकरच्या तळाशी असलेला पृष्ठभाग वेळीच योग्य पद्धतीने स्वच्छ करायला विसरु नका. जर तुम्ही कुकरच्या तळाशी असलेल्या पृष्ठभागावरील चिकटलेले पदार्थ काढले नाहीत तर त्यात दुसरा पदार्थ करताना तो कदाचित खराब होऊ शकतो. यासाठी वेळीच कुकरची योग्य पद्धतीने स्वच्छता करा.
तासंतास पुऱ्या लाटण्याची झंझटच विसरा! फक्त ९९ रुपयांत आणा 'पुरी कटर' - वेळखाऊ काम होईल पटकन...