थंडीचे दिवस सुरु झाल्याने हवेत प्रचंड गारवा असतो. या वातावरणातील बदलांमुळे सोसाट्याचा वारा आणि थंडी फार मोठ्या प्रमाणात जाणवू लागते. जसजसे हवेतील गारवा वाढतो तशी कडाक्याची थंडी पडायला सुरुवात होते. दिवसेंदिवस या वाढत जाणाऱ्या थंडीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण उबदार कपड्यांचा वापर करतो. सतत पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीत उब मिळावी म्हणून आपण शाल, स्वेटर, ब्लॅंकेट, गोधड्या, चादरी कपाटांतून बाहेर काढतो. भरपूर थंडी पडायला सुरुवात झाली की आपण याच ब्लॅंकेट, चादरी, गोधड्या अंगावर घेऊन मस्त उबेचा आसरा घेऊन झोपी जातो( 3 Hacks to Stay Warm in Bed this Winter).
खरंतर, आपण थंडीत उब मिळावी म्हणून या चादरी, ब्लॅंकेट, गोधड्या वापरतो. परंतु काहीवेळा असे होते की, हवेत इतका गारवा किंवा भरपूर थंडी असते की या चादरी, ब्लॅंकेट, गोधड्या स्वतःच गार पडतात. कित्येकदा आपल्याला अनुभव आला असेल की आपण कमी थंडी लागावी म्हणून अंगावर ब्लँकेट, चादरी ओढून झोपतो, पण याच चादरीचे कापड थंडीने गार (Winter's Top 3 Quick Tricks For Staying Warm In Bed ) पडलेले असते. अशावेळी थंडी पासून बचाव करणाऱ्या या गोधड्या, ब्लँकेट्स अंगावर घेतल्या की आपल्याला अजूनच थंडी लागते. अशावेळी ऐन थंडीत या उब देणाऱ्या गोधड्या, चादरी थंड पडल्या असतील तर नेमकं काय करावं हे समजत नाही. यासाठी थंडीत उब देणाऱ्या गोधड्या, चादरी, ब्लॅंकेट्सचा उबदारपणा पुन्हा आणण्यासाठी या सोप्या ट्रिक्स नक्की वापरा(What are the best winter hacks to keep blankets warm & cozy).
थंडीत उब देणाऱ्या गोधड्या, चादरी थंड पडल्या असतील तर...
उब देणाऱ्या गोधड्या, चादरी थंड पडल्या असतील तर अशा चादरी - गोधड्या अंगावर घेतल्या की त्यांच्या थंडाव्याने अधिकच थंडी लागते. असे होऊ नये म्हणून या गोधड्या, चादरी, ब्लॅंकेट्सना इन्स्टंट उब यावी म्हणून आपण नेमके काय करु शकतो, याबाबतच्या ३ सोप्या ट्रिक्स alshihacks या इंस्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आल्या आहेत.
१. गरम पाण्याची बाटली :- थंडीत उब देणाऱ्या गोधड्या, चादरी, ब्लँकेट्स थंड पडल्या असतील तर तर त्यांना इन्स्टंट उबदारपणा आणण्यासाठी आपण गरम पाण्याच्या बाटलीचा वापर करु शकतो. यासाठी झोपण्यापूर्वी १० ते १५ मिनिटे आधी ३ ते ४ मोठ्या पाण्याच्या बाटल्या घेऊन त्यात गरम पाणी भरुन घ्यावे. या बाटल्या बेडवर किंवा आपण जी चादर अंगावर घेणार आहे त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून द्याव्यात. झोपताना या बाटल्या काढाव्यात. यामुळे थंड पडलेल्या चादरी, ब्लँकेट्समध्ये उब निर्माण होते. या गरम पाण्याच्या बाटलीमधील हिट या चादरी, ब्लँकेट्समध्ये येते.
खाऊन तर पाहा आवळा आणि ओल्या हळदीचा आंबटगोड ठेचा, हिवाळ्यातल्या जेवणाची वाढते रंगत...
२. इस्त्रीचा असा करा वापर :- गरम पाण्याच्या बाटलीप्रमाणेच आपण इस्त्रीचा देखील वापर करु शकतो. थंडीत गारव्याने थंड पडलेल्या चादरी, ब्लँकेट्समध्ये इन्स्टंट उब निर्माण करण्यासाठी झोपण्यापूर्वीची चादरी, ब्लँकेट्स, गोधड्यांवर इस्त्री फिरवून घ्यावी. झोपण्यापूर्वी सगळ्या चादरी, ब्लँकेट्स, गोधड्यांना इस्त्री करून घ्यावी.
साडीची घडी ‘अशी’ घाला झटपट, पाहा भन्नाट ट्रिक! कपाटही दिसेल आवरलेलं- साड्या राहतील नव्याकोऱ्या...
३. हिटिंग बॅगचा वापर करा :- आपण गरम पाण्याचा शेक घेण्यासाठी ज्या हिटिंग बॅगचा वापर करतो त्याने देखील आपण चादरी, ब्लँकेट्स, गोधड्यांना इन्स्टंट उबदारपणा देऊ शकता. यासाठी झोपण्यापूर्वी १० ते १५ मिनिटे आधी या हिटिंग बॅग गरम पाण्याने भरुन अंथरुणात ठेवाव्यात जेणेकरुन गार पडलेल्या अंथरुणात पटकन उब तयार होईल व चादर, ब्लँकेट्स अंगावर घेतल्याने थंडी नाही लागणार.
अशाप्रकारे आपण ऐन थंडीत या उब देणाऱ्या गोधड्या, चादरी थंड पडल्या असतील तर त्यात इन्स्टंट उब निर्माण करु शकतो. यासाठी आपण गरम पाण्याची बाटली, इस्त्री आणि हिटिंग बॅगचा वापर करु शकतो.