Lokmat Sakhi >Social Viral > छत्रीचे गंजलेले हॅन्डल स्वच्छ करा ५ मिनिटांत, जुनी छत्री दिसेल नव्यासारखी...

छत्रीचे गंजलेले हॅन्डल स्वच्छ करा ५ मिनिटांत, जुनी छत्री दिसेल नव्यासारखी...

How to Remove Rust Stains from Your Umbrella : छत्रीच्या काड्या किंवा हॅण्डल गंजून खराब झाले असेल तर घरीच करा हे सोपे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2024 06:35 PM2024-07-25T18:35:14+5:302024-07-25T18:53:39+5:30

How to Remove Rust Stains from Your Umbrella : छत्रीच्या काड्या किंवा हॅण्डल गंजून खराब झाले असेल तर घरीच करा हे सोपे उपाय...

What can I use to get rid of rust on an umbrella How to Remove Rust Stains from Your Umbrella | छत्रीचे गंजलेले हॅन्डल स्वच्छ करा ५ मिनिटांत, जुनी छत्री दिसेल नव्यासारखी...

छत्रीचे गंजलेले हॅन्डल स्वच्छ करा ५ मिनिटांत, जुनी छत्री दिसेल नव्यासारखी...

पावसाळ्यात छत्री हाच काय तो आपला खरा साथीदार असतो. मुसळधार कोसळणाऱ्या पावसात भिजू नये म्हणून आपण छत्री वापरतो. साधारणतः आपण वर्षभर छत्री वापरत नाही. छत्रीचा वापर आपण कडक ऊन किंवा पाऊस यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी करतो. पावसाळ्यात छत्री आपण कायम आपल्यासोबतच ठेवतो. पावसाळ्यात गरज लागणारी छत्री आपण एरवी वर्षभर तशीच माळ्यावर किंवा कपाटात एका बाजूला ठेवतो(What can I use to get rid of rust on an umbrella).  

छत्रीचा वर्षभरात फारसा वापर होत नसल्याने काहीवेळा या छत्रीच्या काड्या किंवा तिचे हॅण्डल गंजून खराब होते. अशी गंज लागलेली छत्री आपल्याला व्यवस्थित वापरता येत नाही. त्याचबरोबर छत्रीच्या काड्या व हॅण्डल गंजले असल्याने छत्रीची उघडझाप करताना अनेक समस्या येतात. काहीवेळा तर या छत्रीच्या काड्या गंजून इतक्या खराब होतात की त्या छत्रीतून पाणी गळू लागते, त्यामुळे अशी गंजलेली छत्री वापरणे कठीण जाते. यासाठीच जर छत्रीच्या काड्या गंजून खराब झाल्या असतील तर काही सोप्या ट्रिक्सचा वापर करुन आपण छत्रीला लागलेली गंज अगदी सहज पद्धतीने काढू शकतो(How to Remove Rust Stains from Your Umbrella). 

छत्रीच्या काड्यांना व हॅण्डलला लागलेली गंज कशी काढावी ? 

१. बेकिंग सोडा आणि चुना :- एका भांड्यात २ चमचे बेकिंग सोडा, १ चमचा  चुना आणि काही थेंब पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट गंजलेल्या भागावर लावा आणि सुमारे ५ मिनिटे ते तसेच राहू द्या. त्यानंतर, क्लिनिंग ब्रश किंवा सँडपेपरने स्क्रब करा. चुना गंज क्रिस्टल्स सक्रिय करतो आणि बेकिंग सोडा त्यांना मऊ करतो, ज्यामुळे गंज काढणे सोपे होते. त्याचबरोबर आपण आणखी एक उपाय करु शकता. बेकिंग सोडा पाण्यात मिसळून त्याची घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट गंजलेल्या भागावर लावा आणि काही वेळ तसेच राहू द्यावे शेवटी, टूथब्रशने ते स्वच्छ करा. 

२. कच्चा बटाटा आणि डिशवॉशिंग लिक्विड :- कच्चा बटाटा अर्धा कापून त्यावर डिशवॉशिंग लिक्विड ओता. त्यानंतर गंजलेल्या भागावर बटाटा चोळा. बटाट्यामध्ये असलेले ऑक्सॅलिक ऍसिड गंज काढण्यास मदत करते. बटाटा गंजलेल्या भागावर घासून घेतल्यानंतर पाण्याने धुवा आणि कोरडे करा. यामुळे जुनी गंज संपूर्णपणे निघून जाईल. 

३. ॲल्युमिनियम फॉइल आणि पाणी :- ॲल्युमिनियम फॉइलचा एक छोटा तुकडा घ्या आणि पाण्यात बुडवा. नंतर गंजलेल्या भागावर हा तुकडा घासून घ्या. फॉइल गंज काढून टाकण्यासाठी उपयुक्त ठरते. 

४. बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस :- एका भांड्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस समान प्रमाणात मिसळा. त्यानंतर, गंजलेला भाग या मिश्रणात भिजवा आणि ३० मिनिटे ते तसेच राहू द्यावे. त्यानंतर ब्रश किंवा स्पंजचा वापर करुन हा गंजलेला भाग हलकेच घासून घ्यावा. यामुळे गंज निघण्यास मदत होते.

Web Title: What can I use to get rid of rust on an umbrella How to Remove Rust Stains from Your Umbrella

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.