Join us  

कुकरचा स्फोट झाल्याने महिलेचा मृत्यू; तुमच्याही घरातली शिट्टी-गॅसगेट खराब तर झालेली नाही?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 4:57 PM

What Causes Pressure Cooker Explosions : प्रेशर कुकरचा स्फोट इतका जोरदार होता की कुकरचे तुकडे झाले. ते तुकडे महिलेच्या डोक्यात घुसले.

प्रत्येकाच्याच घरी स्वयंपाक बनण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर केला जातो. डाळी, पुलाव, भात, खीर असे पदार्थ अगदी कमीत  कमी वेळात कुकरमध्ये तयार होतात. कुकरच्या वापरामुळे दुप्पट वेळ वाचतो आणि गॅसचीही बचत होते. पण कुकरचा वापर  करताना निष्काळजीपणा करणं महागातही पडू शकतं. एक महिला घरात अन्न शिजवत असताना प्रेशर कुकरचा मोठा स्फोट झाला आहे. यामध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. (Pressure cooker in jaipur painful death of cooking woman pieces strewn up to ceiling)

प्रेशर कुकरचा स्फोट इतका जोरदार होता की कुकरचे तुकडे झाले. ते तुकडे महिलेच्या डोक्यात घुसले. यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.  राजस्थानात घडलेल्या या घटनेची  माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. लिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेशर कुकरची शिट्टी खराब झाल्यामुळे कुकरमधून वाफ बाहेर येत नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे कुकरच्या आत प्रचंड दाब निर्माण होऊन मोठा आवाज होऊन त्याचा स्फोट झाला. (What Causes Pressure Cooker Explosions)

अनेकदा कुकरमध्ये व्यवस्थित प्रेशर तयार होत नाही त्यामुळे शिट्ट्या होत नाहीत आणि शिट्टीतून पाणी बाहेर येऊ लागतं. याशिवाय कुकरचं रबरसुद्धा लूज होतं आणि झाकणातून हवा बाहेर येत. अशावेळी त्वरीत कुकर बदलायला हवा.  काही सोप्या किचन टिप्स तुमचं काम अधिक सोपं करतील.

कुकरची शिट्टी होताच पाणी बाहेर येतं? ५ टिप्स, ना गॅस खराब होणार ना कुकर- वेळही वाचेल

१) सगळ्यात आधी कुकरचं रबर चेक करून घ्या. अनेकदा रबर कट किंवा डॅमेज होतं. त्यामुळे शिट्टीतून जास्त पाणी  बाहेर येतं. 

२) जेवण बनवण्याआधी कुकरची शिट्टी काढून व्यवस्थित साफ करा. त्यात कोणतेही खाण्याचे पदार्थ अडकलेले नसतील याची काळजी घ्या.

३)  कुकर हॅण्डल व्यवस्थित बंद आहे की नाही ते पाहा. कुकरमध्ये काहीही शिजवताना  गॅस लो फ्लेमवर  ठेवा. यामुळे कुकरमधून पाणी बाहेर येणार नाही.

४) अनेकदा कुकरचे रबर सैल झाल्यानं व्यवस्थित प्रेशर तयार होत नाही. अशावेळी शिट्टी होत नाही. 

५) कुकर उघडून रबर बाहेर काढा आणि थंड पाण्यानं धुवा. यासाठी रबर थोडं एअर टाईट असावं.

६) जर त्यातून पाणी येत असेल तर १ तासासाठी फ्रिजमध्ये ठेवा. कुकरचं रबर डॅमेज झालं असेल तर ते वेळीच बदला.

७) कुकरचं झाकण उघडत नसेल तर प्रेशर व्हॉल्व्ह काढा आणि प्रेशर कुकर थंड होऊ द्या.

टॅग्स :सोशल व्हायरलगुन्हेगारी