तब्बल ९ महिने अंतराळात राहून अखेर अंतराळवीर सुनीता विल्यम्स सुखरूपपणे पृथ्वीवर परतल्या आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने सुटकेचा निश्वास सोडला. खरंतर असं म्हटलं जातं की कुठल्याही अंतराळवीरासाठी अंतराळात जास्तीत जास्त काळ राहाणे ही एक मोठी नामी संधी असते. प्रत्येक जण त्या संधीच्या शोधात असतो आणि सुनीता विल्यम्स यांना ती संधी मिळाली. त्यांनी ९ महिने अंतराळात वास्तव्य केले. यामुळे त्या आता अंतराळात सगळ्यात जास्त वेळ घालविणाऱ्या महिला ठरलेल्या आहेत. या ९ महिन्यांच्या काळात त्यांनी तिथे नेमकं काय केलं असावं असा प्रश्न अनेकांना पडणं अगदी साहजिक आहे. म्हणूनच त्याविषयीची ही रंजक माहिती.. (What did Sunita Williams do while spending 9 months in space?)
सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही ५ जून २०२४ रोजी अंतराळ स्टेशनवर पोहोचले होते. त्यांची यात्रा खरंतर फक्त ८ दिवसांची होती. पण त्यांच्या वापस येण्याच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आणि त्यांचा तिथला मुक्काम बराच लांबला.
'हा' त्रास असणाऱ्या व्यक्तींनी डोक्याला तेल लावणे टाळावे! बघा तुम्ही तर त्यात नाही ना?
या प्रदिर्घ मुक्कामात त्यांनी नेमकं काय केलं असावं याची उत्सुकता सर्वसामान्यांना आहे. या मोठ्या काळात त्यांच्या कामात कुठेही खंड पडला नव्हता. सुनीता यांनी स्पेस स्टेशनची देखभाल करणे, तिथल्या काही यंत्रांची स्वच्छता आणि काही त्यात बिघाडी झाली असेल तर त्याची दुरुस्ती करणे अशी अनेक कामे केली. स्पेस स्टेशन मध्ये अनेकदा जुनी उपकरणे बदलून तिथे नव्याने काही गोष्टी सेट कराव्या लागतात. या सगळ्या कामांमध्येही त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली.
त्यांनी आणि त्यांच्या टीमने मिळून जवळपास ९०० तास वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास केला. १५० पेक्षाही जास्त प्रयोग केले आणि त्यांनी नऊ वेळा स्पेस वॉक केला.
शरीरातली Vitamin B12 ची कमतरता भरून काढणारे ५ शाकाहारी पदार्थ, तब्येत सांभाळायची तर...
त्यांच्या स्पेस वॉकचा एकूण प्रवास ६२ तास आणि ९ मिनिटांचा रेकॉर्ड करण्यात आलेला आहे. सुनिता विल्यम्स यांनी बायोन्यूट्रिएंट्स या विषयातही स्पेस स्टेशनमध्ये अभ्यास केला. यामध्ये जिवाणूंचा वापर करून काही प्रयोग करण्यात आले. अशा सगळ्या कामांमध्ये सुनीता गुंतून जात होत्या..