सोशल मीडिया माध्यमे ही सध्या आपल्या गळ्यातील ताईत झाली आहेत. २४ तास हातात असणारा मोबाइल आपल्या जगण्याची अत्यावश्यक गरज झाला आहे हे नक्की. एकमेकांशी बोलण्यासाठी उपयोगी असणारा मोबाइल आता आपली दिवसभरातील असंख्य कामे एका क्लिकवर करतो. किराणा किंवा कपड्यांच्या खरेदीपासून ते बॅंकेच्या व्यवहारांपर्यंत आणि ऑफीसच्या कामांपासून ते मनोरंजनापर्यंत सगळ्या गोष्टी या मोबाइलच्या माध्यमातून सोप्या झाल्या आहेत. (Social Media Surfing) सोशल मीडियाचा वापर गेल्या काही वर्षात वेगाने वाढला असून अनेकांसाठी हे एकप्रकारचे व्यसन आहे. अनेकदा आपण सोशल मीडियावर काही पोस्ट करत नसलो तरी विविध प्रकारचा कंटेंट कन्झुम करणारे ग्राहक नक्कीच असतो. युट्यूबसारख्या दृश्य माध्यमात तर दर मिनीटाला जगभरातून कंटेंट अपलोड होत असतो (What do Girls Search on You tube).
भारतातील तरुणी युट्यूबचा वापर कोणत्या गोष्टी पाहण्यासाठी करतात याबाबतचा एक रिपोर्ट युट्यूबने नुकताच प्रसिद्ध केला. युडट्यूबच्या माध्यमातून आपण कधी अभ्यास करतो तर कधी एखादी रेसिपी, कधी घरगुती उपाय पाहतो तर कधी आणखी काही. भारतात एकूण १५ कोटी इंटरनेट युजर्स असून त्यातील ६ कोटी महिला आहेत. यातील जवळपास ७५ टक्के महिला या १५ ते ३४ वयोगटातील म्हणजेच तरुणी असल्याचे एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. आता इतर सोशल मीडिया माध्यमांप्रमाणेच महिला युट्यूबचा वापर कशाप्रकारे करतात याची माहिती युट्यूबने नुकतीच प्रसिद्ध केली.
जेवढा मोठा आहेर, तेवढं भारी जेवण! लग्नाच्या आमंत्रणासह नवरीने दिली भन्नाट ऑफर...
तर महिला युट्यूब शॉर्टस किंवा इन्स्टाग्रामवरील काही व्हिडिओ, टिकटॉक या गोष्टी सर्वाधिक प्रमाणात सर्च करतात. कधी रात्री झोपताना तर कधी दिवसा वेळ मिळाला की आपण काही ना काही माहिती घेण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याचदा या गोष्टी आपल्या आयुष्याशी निगडित असण्याची किंवा आपले मनोरंजन करणाऱ्या असण्याची शक्यता असते. लहान व्हिडिओशिवाय अनेक तरुणी युट्यूबवर डेस्टीनेशन वेडिंग, प्री-वेडिंग फोटोशूट, व्हिडिओ अशा गोष्टी पाहतात. युट्यूबवर अशाप्रकारची माहिती देणारे असंख्य चॅनेल्स असतात, ज्या माध्यमातून तरुणींना यासंबंधी माहिती सहज उपलब्ध होते.
तरुणी युट्यूबवर गाणी ऐकायला किंवा पाहायलाही प्राधान्य देत असल्याचे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तरुणांचीही गाण्यांसाठी युटयूबला जास्त पसंती असल्याचे दिसते. याशिवाय महिलांचा कलेकडे जास्त ओढा असल्याने त्या क्राफ्ट आयडीयाजही युट्यूबवर पाहतात आणि त्यातले काही प्रयोग करुन आपले घर सजवण्याचा प्रयत्न करतात. याशिवाय प्रत्येक तरुणीला आपण सुंदर दिसावे असे वाटते. त्यादृष्टीने सध्या असलेले मेकअप, फॅशन ट्रेंड पाहण्यात तरुणी बराच वेळ घालवतात. विविध प्रकारच्या ब्युटी ट्रीटमेंटस आणि घरगुती उपाय पाहणे या महिलांना जास्त आवडत असल्याचे या रिपोर्टमध्ये नोंदवण्यात आले आहे.