Lokmat Sakhi >Social Viral > लेक लाडकी योजना नक्की काय आहे? सरकार मुलींना किती रक्कम देणार..

लेक लाडकी योजना नक्की काय आहे? सरकार मुलींना किती रक्कम देणार..

Lek Ladki Yoajana Scheme By Maharashtra State Government Know How Much Amount One Can Get in Same : महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक संकल्पात विशेष तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2023 02:30 PM2023-03-10T14:30:46+5:302023-03-10T15:45:58+5:30

Lek Ladki Yoajana Scheme By Maharashtra State Government Know How Much Amount One Can Get in Same : महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक संकल्पात विशेष तरतूद

What exactly is Lek Ladki Yojana? by Maharashtra State Government How much amount will the government give to the girls.. | लेक लाडकी योजना नक्की काय आहे? सरकार मुलींना किती रक्कम देणार..

लेक लाडकी योजना नक्की काय आहे? सरकार मुलींना किती रक्कम देणार..

एकीकडे महिला दिनाला महिलाशक्तीला सलाम केला जात असताना त्याच्या दुसऱ्याच दिवशी राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी बऱ्याच विशेष घोषणांची तरतूद करण्यात आली आहे. महिला सक्षमीकरण, विकास आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकारनेही अतिशय महत्त्वाची पाऊले उचलत असल्याचे चित्र आहे. स्त्रीभ्रूण हत्या, मुलींना समाजात दुय्यम स्थान देणे यांमुळे आजही असंख्य महिला स्वावलंबी नाहीत. मात्र हे चित्र बदलावे यासाठी शासन दरबारी प्रयत्न होताना दिसत आहेत (Lek Ladki Yoajana Scheme By Maharashtra State Government Know How Much Amount One Can Get in Same). 

राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुरुवारी विधानसभेत आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा केली. यामध्ये 'लेक लाडकी' ही योजना अत्यंत लक्षवेधी ठरली. राज्य शासनाच्या या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. यामध्ये मुलींना वयाच्या विशिष्ट टप्प्यावर  ठराविक रक्कम दिली जाणार आहे.

काय आहे नेमकी योजना ? 

मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर ५००० रुपये जमा केले जातील. त्यानंतर चौथीत असताना ४०००, सहावीत असताना ६००० आणि मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात ८००० रुपये जमा केले जातील. लाभार्थी मुलीचे वय १८ झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख मिळतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे मुलीच्या शिक्षणाचा, पालनपोषणाचा आणि इतर खर्च करणे सोपे होणार आहे. अल्प उत्पन्न गटातील मुलींनी शिकावे, स्वत:च्या पायावर उभे राहावे यासाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे.

याशिवायही महिलांना एसटी प्रवासात सूट, अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या मानधनात वाढ यांसारख्या अनेक योजना जाहीर केल्या. त्यामुळे अर्थसंकल्प महिलांच्यादृष्टीने अतिशय फायदेशीर असल्याचे चित्र आहे. 
 

Web Title: What exactly is Lek Ladki Yojana? by Maharashtra State Government How much amount will the government give to the girls..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.