व्यस्त जीवनशैलीमुळे लोकांना स्वतःकडे लक्ष द्यायला जमत नाही. खाणे-पिणे आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींव्यतिरिक्त, वैयक्तिक काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. हातांची व पायांची स्वच्छता राखणे देखील तितकेच महत्वाचे आहे. लोकं त्वचेची काळजी घेतात, पण बहुतांश वेळी नखांना दुर्लक्षित करतात. नखांची स्वच्छता खूप महत्वाची आहे. नखांमध्ये काही वेळेला घाण साचते, जे जेवताना अन्नासोबत पोटात जाते. ज्यामुळे इतर आजार होण्याची शक्यता वाढते.
नखं कापण्यासाठी आपण नेलकटरचा वापर करतो. याने नखं शेपमध्ये कापले जातात. व नखांना दुखापत होत नाही. आपण नेलकटरमध्ये पाहिले असेल की, त्यात २ चाकूसारखे उपकरण जोडण्यात आलेले असतात. पण त्याचा वापर कशासाठी केला जातो? हे अद्याप काही लोकांना माहित नाही. नेलकटरमध्ये असलेल्या या दोन धारधार गोष्टींचा वापर कशासाठी करता येतो? चला पाहू(What exactly is the function of the two knives in the nail cutter? What are they used for?).
फ्रिजचा डोअर रबर कळकट - खराब झालाय? ५ टिप्स, स्वच्छता झटपट-फ्रिज दिसेल नव्यासारखा
बॉटल ओपनर
नेलकटरचा वापर अनेक कामांसाठी होतो. पण याचा वापर आणखी कशासाठी होतो? याची कल्पना आपल्याला नसते. नेलकटरच्या आत २ प्रकारचे चाकू असतात. त्यातील एक उपकरण बॉटल ओपनर म्हणून वापरला जातो. अनेकदा सहलीला ज्यूस बॉटल घेतल्यानंतर ते उघडणे कठीण जाते. या बॉटलचे झाकण उघडायचे असेल तर, नेलकटरच्या आतील एका चाकूचा वापर करा. नेलकटरवर एक लहान वक्र आकाराचा चाकू असतो, त्याच्या मदतीने आपण बॉटलचे झाकण उघडू शकता.
शेगडीची फ्लेम कमी झालीय? ३ सोपे उपाय; वेळ वाचेल- होईल स्वयंपाक झरझर
लहान चाकू
जर आपण कधी ट्रीप किंवा बाहेर गेला असाल, व फळ किंवा इतर काही पदार्थ खायची इच्छा झाली असेल तर, या लहान चाकूचा वापर करा. आपण छोट्या चाकूच्या मदतीने लिंबू, संत्री किंवा इतर पदार्थ सहज चिरू शकता. याव्यतिरिक्त काही लोकं धारदार चाकूच्या टोकांचा वापर करून, नखांची घाण साफ करतात. पण या चाकूचा वापर करताना सांभाळून वापर करावा.