Join us

ना तामझाम ना जेवणावळी, तरुण जोडपी म्हणतात आम्ही ‘मायक्रो वेडिंग’ करणार, लग्नाचा नवा ट्रेंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2025 10:05 IST

Micro Wedding Trends: Intimate Wedding Planning: Small Wedding Cost Breakdown: Budget-Friendly Wedding Ideas: Personalized Micro Wedding: Intimate Wedding Venue Selection: Planning a Micro Wedding on a Budget: मायक्रो वेडिंग म्हणजे काय? त्याचे फायदे काय जाणून घेऊया.

लग्न म्हटलं की, दोन्ही कुटुंबाच्या घरात आनंदी वातावरण असतं. हिंदू धर्मात लग्न पद्धतीला विशेष असे महत्त्व आहे.(Micro Wedding Trends) हा सोळाव्या संस्कारापैंकी पंधरावा संस्कार मानण्यात येतो. काळाच्या ओघात लग्नाच्या शैलीमध्ये बरेच बदल होताना दिसून येत आहे. (Intimate Wedding Planning) पूर्वीच्या काळात लग्नात कुटुंबातील नातेवाईकांना आणि जवळच्या लोकांना आग्रहाचे निमंत्रण असायचे. लग्न अगदी थाटामाटात साजरे केले जात असे. (Small Wedding Cost Breakdown) पण सध्या काळानुसार लग्न पद्धतीत बदल होत आहे. लग्नात काका, मामा किंवा आत्या रुसलेली पाहायला मिळायची. पण आता या नव्या लग्न पद्धतीमुळे कुटुंबातील सगळेच खूश राहातील. (Budget-Friendly Wedding Ideas)वाढत्या महागाईमुळे पारंपरिक लग्नाऐवजी तरुण जोडप्यांची मायक्रो वेडिंगला पसंती आहे. हा लग्नाचा एक प्रकार असून यामध्ये कमी लोकांसह एक खास आणि जिव्हाळ्याचा क्षण साजरा केला जातो. मायक्रो वेडिंग म्हणजे काय? त्याचे फायदे काय जाणून घेऊया. (Personalized Micro Wedding)

लेकीला आईची उणीव भासू नये म्हणून बाबा जेव्हा आई होतो, पाहा दत्तक पित्याची अफाट माया..

मायक्रो वेडिंग म्हणजे काय?

मायक्रो वेडिंग हे अगदी कमी आणि मोजक्या लोकांमध्ये होणारे लग्न आहे. यामध्ये २० ते ५० पाहुणे उपस्थित राहतात. या ठिकाणी लोकांची फार गर्दी पाहायला मिळत नाही. तसेच पारंपरिक लग्नांसारखे मोठे कार्यक्रम देखील नसतात. त्याऐवजी वधू-वर आणि त्यांच्या जवळच्या लोकांवर लक्ष केंद्रित केले जाते. या प्रकारच्या लग्नात साधेपणा, जवळीक वैयक्तिक गोष्टींवर अधिक भर दिला जातो. 

कबुतरांच्या विष्ठेच्या वासामुळे हैराण झालात? बाल्कनीत लावा 'हे' रोप, सोप्या टिप्स - घरही राहिल स्वच्छ

मायक्रो वेडिंगचा ट्रेंड का वाढतोय?

कोविड निर्बंध आणि सामाजिक अंतर या छोट्या कार्यक्रमांकडे लोक वळले आहे. यानंतर खर्च वाचावा आणि मोजक्याच लोकांमध्ये लग्न करण्याची संकल्पना अनेकांना आवडली. ज्यामुळे पैशांची बचत होते. जास्त प्रमाणात लोकांना बोलवल्यामुळे पैसे अधिक खर्च होतात. यामध्ये केटरिंग, सजावट आणि हॉलचा खर्च हा बजेटमध्ये होतो. यामुळे जोडप्यांना त्यांचे बजेट हनिमून किंवा घर खरेदीसारख्या इतर गरजांसाठी वापरता येते. तसेच कमी लोकांमध्ये लग्न केल्याने आपल्या कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींसोबत अधिक चांगला वेळ घालवता येतो. खूप लोकांना बोलवल्यामुळे जोडप्यांना अनेकदा पाहुण्यांना वेळ देता येत नाही. मायक्रो वेडिंगमुळे आपल्याला बीच, गार्डन किंवा डेस्टिनेशन वेडिंग करता येते. तसेच जोडप्यांना आपल्या आवडीनुसार थीम देखील सिलेक्ट करता येते. कमी लोकांना बोलवल्यामुळे कमी व्यवस्था कराव्या लागतात. ज्यामुळे तणावमुक्त लग्न नियोजित करता येते. तसेच कमी पाहुण्यांमुळे अन्न वाया जात नाही. सजावटीचा अपव्यय आणि प्रदूषण कमी होते. 

 

टॅग्स :सोशल व्हायरल