Lokmat Sakhi >Social Viral > डिटर्जंट की साबण? कपडे धुण्यासाठी काय वापरणं योग्य? कपडे भुरकट न होता कायम नव्यासारखे हवे तर..

डिटर्जंट की साबण? कपडे धुण्यासाठी काय वापरणं योग्य? कपडे भुरकट न होता कायम नव्यासारखे हवे तर..

What is good for cleaning clothes, soap or detergent : अनेकांच्या घरी कपडे धुण्यासाठी पावडर आणि साबण दोन्ही वापरले जातात. पण कपड्यांसाठी काय वापरणं जास्त योग्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2023 02:54 PM2023-09-26T14:54:07+5:302023-09-26T14:55:25+5:30

What is good for cleaning clothes, soap or detergent : अनेकांच्या घरी कपडे धुण्यासाठी पावडर आणि साबण दोन्ही वापरले जातात. पण कपड्यांसाठी काय वापरणं जास्त योग्य?

What is good for cleaning clothes, soap or detergent | डिटर्जंट की साबण? कपडे धुण्यासाठी काय वापरणं योग्य? कपडे भुरकट न होता कायम नव्यासारखे हवे तर..

डिटर्जंट की साबण? कपडे धुण्यासाठी काय वापरणं योग्य? कपडे भुरकट न होता कायम नव्यासारखे हवे तर..

प्रत्येक घरात कपडे धुण्यासाठी साबण, डिटर्जंट पावडर किंवा लिक्विडचा वापर होतो. याचा वापर कपड्यांवरील डाग, मळ स्वच्छ करण्यासाठी होतो. कपडे धुण्यापूर्वी आपण कपडे भिजत घालतो. कपडे भिजत घालण्यासाठी आपण डिटर्जंट पावडरचा वापर करतो. जर आपण कपडे हाताने धुवत असाल तर, कपडे धुण्याच्या साबणाचा वापर होतो. काही लोकं कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर करतात. अशा वेळी कपडे धुण्याच्या साबणाची गरज भासत नाही.

परंतु, कपडे धुण्यासाठी डिटर्जंट पावडर फायदेशीर ठरते की, कपडे धुण्याच्या साबणामुळे कपडे चकाचक होतात? कपडे धुण्यासाठी नेमकं वापरावं काय? या दोघांमधील फरक काय? कपडे धुण्यासाठी काय उपयुक्त ठरेल? पाहूयात(What is good for cleaning clothes, soap or detergent).

साबण विरुद्ध डिटर्जंट पावडर

कपडे धुण्याचा साबण विविध तेलांच्या सॅपोनिफिकेशन प्रक्रियेद्वारे तयार केले जाते. त्यामुळे साबण पूर्णपणे पाण्यात विरघळण्यास बराच घेते. तर, डिटर्जंट हा एक क्लिनिंग एजंट आहे. जे विशेषतः कपड्यांची सफाई करण्यास जास्त वेळ घेत नाही. ते लवकर पाण्यात विरघळते, व साबणापेक्षा कपड्यांवर जलद गतीने काम करते.

लेकीला मोकळ्या हवेत फिरायलाही नेता येत नाही कारण.. आलिया भट सांगते, आईची हौस आणि..

कपड्याच्या फॅब्रिकनुसार निवडा

सिल्क, कॉटन, वुलनसारखे फॅब्रिक कापड अतिशय काळजीपूर्वक धुवावे लागतात. अशा परिस्थितीत हे कपडे नेहमी डिटर्जंटने धुवावेत. डिटर्जंटमुळे रेशमी कापड खराब होत नाही. साबणात काही कठोर रसायने आढळतात, जी सर्व प्रकारच्या कपड्यांसाठी योग्य ठरत नाही.

डाग काढण्यासाठी बेस्ट

कपड्यांवरील डाग काढण्यासाठी साबण फारसा प्रभावी ठरत नाही. अशा स्थितीत कपड्यांवरील हट्टी डाग काढण्यासाठी आपण डिटर्जंटचा वापर करू शकता. डिटर्जंटमध्ये डाग काढून टाकण्याची क्षमता असते. याच्या मदतीने आपण कपड्यांवरील कॉफी, चहा, ग्रेव्ही, ज्यूसचे डाग सहज साफ करू शकता.

पिण्याच्या पाण्याची बॉटल आतून पिवळट झाली? ३ सोप्या टिप्स, न घासता बाटल्या होतील चकाचक

कपडे धुण्यासाठी डिटर्जंट बेस्ट

साबणापेक्षा कपड्यांवर डिटर्जंट प्रभावी ठरते. डिटर्जंट विशेषतः कपडे धुण्यासाठी डिझाइन केलेले आहे. त्यामुळे कपडे धुण्यासाठी नेहमी डिटर्जंटचा वापर करावा.

Web Title: What is good for cleaning clothes, soap or detergent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.