Join us  

सेलिब्रिटी पितात ते स्पार्कलिंग वॉटर नेमके काय असते ? हा पाण्याचा कोणता नवीन प्रकार....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2024 1:50 PM

Pros & Cons of Sparkling water : What Is Sparkling Water : स्पार्कलिंग वॉटर म्हणजे नेमकं काय ? हा पाण्याचा नवीन प्रकार कोणता आहे ते पाहूयात...

पाणी हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे असते. पाण्याशिवाय आपण जीवनाची कल्पनाच करु शकत नाही. आपल्या शरीराच्या विविध कार्यांमध्ये पाणी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. निरोगी त्वचा, केस आणि एकूणच आरोग्यासाठी पाणी महत्त्वाचे असते. हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी पिणे महत्वाचे असते. पाणी हे पाणी असत त्यात अनेक प्रकार असतात असं म्हटलं तर कुणाचा विश्वास बसणार नाही(Sparkling Water benefits & disadvantages).

शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी आपल्याकडील सेलिब्रिटी आणि खेळाडू अल्कलाइन पाणी म्हणजेच काळ्या रंगाचे पाणी पितात. परंतु यासोबतच आणखी एका प्रकारच्या पाण्याचा ट्रेंड सध्या पुढे येत आहे आणि ते म्हणजे (drinking Sparkling Water) स्पार्कलिंग वॉटर. सोडा आरोग्यासाठी चांगला मानला जात नसल्याने अनेक लोक आता सोड्याऐवजी स्पार्कलिंग वॉटर पिणे पसंत करतात. परंतु हे स्पार्कलिंग वॉटर म्हणजे नेमकं काय ? हा पाण्याचा नवीन प्रकार कोणता आहे ते पाहूयात(Is Sparkling Water Good for You)

स्पार्कलिंग वॉटर म्हणजे काय ? (What Is Sparkling Water)

स्पार्कलिंग वॉटरला कार्बोनेटेड वॉटर असे देखील म्हणतात. स्पार्कलिंग वॉटर हे एक प्रकारचं पाणी असत ज्यात कार्बन डायऑक्साइड मिसळला जातो. कार्बन डायऑक्साइड प्रचंड प्रेशरने या पाण्यात भरला जातो, यामुळे पाण्यात बुडबुडे उठू लागतात. पोटॅशियम बायकार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट आणि सोडियम सायट्रेट सारखी खनिजे देखील या पाण्यात मिसळली जातात.

विद्या बालन करते नो 'रॉ फूड डाएट' हे डाएट नेमकं आहे तरी काय ? 

दुधी भोपळा आवडत नाही म्हणणारेही दुधीचे थालीपीठ करतील फस्त! मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी मस्त पौष्टिक पदार्थ...

स्पार्कलिंग वॉटर पिण्याचे फायदे काय आहेत ? 

१. तहान भागवण्यासाठी कोल्ड्रिंक्सपेक्षा हे पाणी पिणे हा एक उत्तम पर्याय आहे. 

२. अमेरिकन डेंटल असोसिएशनच्या मते, स्पार्कलिंग वॉटर तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. 

३. स्पार्कलिंग वॉटर तुम्हाला कायम हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. 

४. स्पार्कलिंग वॉटर वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असते. 

५. जर तुम्हांला सोडा पिण्याची सवय असेल आणि ही सवय जर तुम्हाला सोडायची असेल तर स्पार्कलिंग वॉटर हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. 

अंशुला कपूरने शेअर केला ‘स्व स्तन तपासणी’ व्हिडिओ, ८ स्टेप्स- ब्रेस्ट कॅन्सरची चाचणी वेळीच करा...

स्पार्कलिंग वॉटर पिण्याचे तोटे काय आहेत ?

१. या पाण्यात ॲसिडचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे तुमचे पोट खराब होऊ शकते. 

२. हे पाणी अधिक प्रमाणात प्यायल्यास ब्लोटिंग किंवा गॅसची समस्या होऊ शकते. 

३. काही प्रकारच्या स्पार्कलिंग वॉटरमध्ये आर्टिफिशियल स्वीटनर्सचा वापर केला जातो, जे आरोग्यासाठी हानिकारक असते. 

४. फ्लेवर्ड स्पार्कलिंग वॉटरमध्ये भरपूर सोडियम असते, ज्यामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो.

योग्य स्पार्कलिंग वॉटर कसे निवडावे ? 

बाजारातून स्पार्कलिंग वॉटर विकत घेताना त्यात साखर आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असावे हे लक्षात ठेवा. याशिवाय, तुम्ही खरेदी करत असलेल्या स्पार्कलिंग वॉटरमध्ये फ्रुक्टोज कॉर्न सिरप, सोडियम, आर्टिफिशियल स्वीटनर्स, आर्टिफिशियल टेस्ट आणि सुक्रॅलोज यांसारखे आर्टिफिशियल गोड पदार्थ नसावेत.

टॅग्स :सोशल व्हायरलपाणी