Join us  

कमोड स्वच्छ ठेवण्यासाठी महागडे फ्रेशनर- क्लिनर्स आणता? १ सोपा घरगुती उपाय, इन्फेक्शनही राहील दूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2024 6:10 PM

How to clean commode toilet bowl : कमोड स्वच्छ करण्यासाठी महागडे फ्रेशनर, क्लिनर्स वापरण्यापेक्षा करा एक भन्नाट उपाय...

आपण घर, किचन, टॉयलेट, बाथरुम कितीही स्वच्छ ठेवले तरीही ते खराब होतेच. कितीही वेळा स्वच्छ केलं तरीही बाथरुम आणि  कमोड हे खराब होतातच. कमोड कितीही वेळा घासून स्वच्छ केलं तरीही ते रोजच्या वापराने खराब होतेच. रोजच्या वापराने कमोड खराब झाल्याने त्यातून घाण दुर्गंधी येते तसेच सहज न निघणारे हट्टी डागही पडतात. यामुळे कमोड अस्वच्छ दिसू लागते. हे कमोड वेळीच स्वच्छ केले नाही तर ते पिवळे पडायला फारसा वेळ लागत नाही(How to clean commode toilet bowl ).

कमोड स्वच्छ करण्यासाठी आपण अनेकदा महागड्या उपायांचा वापर करतो. वेगवेगळ्या प्रकारचे फिनाईल, टॉयलेट क्लिनर्सचा वापर आपण करतो. आपण घरातले इतर भाग जसे स्वच्छ ठेवतो, तशीच टॉयलेट आणि कमोडची स्वच्छता ठेवणे गरजेचे असते. परंतु अनेकजणींना टॉयलेट आणि कमोडची वारंवार स्वच्छता करणे फारच कंटाळवाणं काम वाटत. किंवा त्यांच्याकडे तेवढा वेळ नसतो. यासाठीच बाथरुम आणि कमोड स्वच्छ ठेवण्यासाठी आपण एक सोपा उपाय नक्कीच फॉलो करु शकतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त आपल्या घरात सहज मिळणारी रोजच्या उपयोगातील वस्तू वापरायची आहे. त्या वस्तूचा वापर केल्यास तुमचं कमोड वारंवार न घासताही अगदी स्वच्छ राहील. त्याचबरोबर कमोडमधून दुर्गंधीही येणार नाही. कोणता आहे हा नेमका सोपा उपाय ते पाहूयात(What is the best way to clean a toilet bowl).

कमोड स्वच्छ ठेवण्यासाठी... 

साहित्य :- 

१. सुगंधित साबण - २ कप २. टूथपेस्ट - अर्धी ट्यूब ३. बेकिंग सोडा - २ टेबलस्पून ४. अ‍ॅल्युमिनियम फॉईल - ४ ते ५ लहान तुकडे ५. टूथपिक - एक लहान काडी 

कुकरच्या झाकणाला पडलेले पिवळे चिकट तेलकट डाग काढण्याचे २ सोपे उपाय, झाकण होईल नव्यासारखे चकचकीत... 

कृती :- 

१. कोणताही सुगंधित साबण घेऊन तो साबण किसणीवर किसून घ्यावा. या साबणाच्या बारीक करुन घेतलेल्या चुऱ्यामध्ये ५ ते ६ टेबलस्पून टूथपेस्ट मिक्स करुन घ्यावी. २. त्यानंतर या मिश्रणात २ टेबलस्पून बेकिंग सोडा घालून हे सगळे मिश्रण एकत्रित कालवून घ्यावे. ३. आता हे मिश्रण मिक्स करुन घेतल्यानंतर या मिश्रणाचे लहान गोलाकार गोळे करुन घ्यावेत. ४. आता अ‍ॅल्युमिनियम फॉईलचे लहान तुकडे घेऊन त्यात या तयार केलेल्या मिश्रणाचा गोळा भरुन घ्यावा. ५. आता हा गोळा अ‍ॅल्युमिनियम फॉईलमध्ये रॅप केल्यानंतर टुथपिकच्या मदतीने त्यावर लहान छिद्र करुन घ्यावीत. 

नव्याकोऱ्या भांड्यांवरचे कागदी स्टिकर कसे काढायचे? शेफ पंकज भदौरीया सांगतात १ सोपी युक्ती...

नेमके वापरायचे कसे ? 

१. अ‍ॅल्युमिनियम फॉईलमध्ये रॅप केलेला गोळा तुम्ही तुमच्या फ्लश टॅन्कमध्ये टाकून ठेवू शकता. २. यामुळे प्रत्येकवेळी फ्लश केल्यानंतर या मिश्रणाच्या मदतीने आपले कमोड स्वच्छ राहण्यास मदत होईल. ३. हा सोपा उपाय वापरल्याने तुम्हाला महागडे टॉयलेट फ्रेशनर आणि क्लिनर खरेदी करण्याची गरजच भासणार नाही. ४. हा सोपा घरगुती उपाय वापरुन तुम्ही कमोड फ्रेश आणि क्लिन ठेवू शकता. 

यासाठीच महागडे कमोड फ्रेशनर आणि क्लिनर खरेदी करण्यापेक्षा हा सोपा उपाय नक्की एकदा करुन पाहा.

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स