किचनमधील काही भांड्यांचा वापर हा दररोज स्वयंपाक तयार करण्यासाठी केला जातो. याचप्रमाणे, आपल्या जेवणात रोज चपात्या हमखास प्रत्येक घरोघरी तयार केल्या जातात. चपात्या तयार करताना त्या लाटण्यासाठी पोळपाट लाटण्याचा वापर आपण सगळेच दररोज करतो. चपात्या तयार करण्यासाठी दररोज (Tip To Keep Your Chakla Belan Last Longer) पोळपाट लाटण्याचा वापर केला जातो (What is the best way to clean a wooden rolling pin) म्हटल्यावर त्याची स्वच्छता देखील तितकीच महत्वाची आहे. रोज वापरुन पोळपाट लाटण खराब होतच यासाठी त्याची वेळोवेळी स्वच्छता करणे तितकेच गरजेचे असते. प्रत्येक घरात वेगवेगळ्या मटेरियलपासून तयार केलेल्या पोळपाट लाटण्याचा वापर केला जातो(HOW TO CLEAN LAKDI POLPAT LATNA).
काहींच्या घरात अल्युमिनियम, स्टील तर काहींजण संगमरवरी किंवा लाकडाच्या पोळपाट लाटण्याचा वापर करतात. यातही इतर धातूंपासून तयार झालेल्या पोळपाट लाटण्याची स्वच्छता करणे सोपे असते परंतु लाकडी पोळपाट लाटण्याची स्वच्छता ठेवणं म्हणजे थोडं अवघड काम. लाकडी पोळपाट लाटणं रोज पाण्याने स्वच्छ केलं तर लाकूड फुगून ते खराब होण्याची शक्यता असतेच. अशावेळी प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो की, लाकडी पोळपाट लाटणं नेमकं कसं स्वच्छ करायचं? यासाठीच लाकडी पोळपाट लाटणं स्वच्छ करण्याची एक सोपी आणि भन्नाट ट्रिक पाहूयात. ही ट्रिक वापरून आपण अगदी सहजपणे लाकडी पोळपाट लाटणं झटपट स्वच्छ करु शकतो.
लाकडी पोळपाट लाटणं झटपट स्वच्छ करण्याची ट्रिक...
लाकडापासून तयार केलेलं पोळपाट लाटणं स्वच्छ करणे म्हणजे सगळ्यांत अवघड काम. लाकडी पोळपाट लाटणं जसे आपण रोज वापरतो तशीच त्याची स्वच्छता करणे देखील गरजेचे असते. परंतु याची स्वच्छता योग्य पद्धतीने करणे देखील तितकेच गरजेचे असते. कित्येक गृहिणींना लाकडी पोळपाट लाटणं स्वच्छ करण्याची योग्य ट्रिक माहित नसते. याचबरोबर, दररोज पाण्याचा वापर करून हे लाकडी पोळपाट स्वच्छ करणे शक्य नसते. कारण पाण्यामुळे लाकूड खराब होऊ शकते किंवा ते व्यवस्थित वाळले नाही तर त्याला बुरशी लागू शकते. यासाठीच लाकडी पोळपाट लाटणं स्वच्छ करण्याची योग्य पद्धत पाहा.
अरे देवा ! पॅनमध्ये बटर घालताच करपते - जळका वास येतो? ६ टिप्स, बटर न जळता स्वाद होईल दुप्पट...
Special Marathi Food: अस्सल मराठी चवीच्या वरणाचे ७ प्रकार, वाफाळत्या भातावर हवंच गरमागरम वरण!
१. सगळ्यांत आधी लिंबाची एक लहान फोड घेऊन ती व्यवथितपणे पोळपाट लाटण्यावर थेट घासून घ्यावी. लिंबाचा रस पोळपाट लाटण्यावर संपूर्णपणे लागेल असे पाहावे. त्यानंतर लिंबाचा रस लावून पोळपाट लाटणं १० ते १५ मिनिटे तसेच ठेवून द्यावे. मग पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा याच पद्धतीने धुवून पोळपाट लाटणं स्वच्छ करून घ्यावे.
२. अशाप्रकारे पोळपाट लाटणं धुतल्यानंतर त्याला परत भांडी घासण्याचा साबण किंवा लिक्विड सोप लावून वेगळं धुण्याची गरज नसते. लाकडी पोळपाट लाटणं कधीही चुकून भांडी घासण्याच्या साबणाने किंवा लिक्विड सोपने धुवू नका.
फ्रिजसारखं गार होईल माठातलं पाणी, ९ टिप्स-भर उन्हात माठातल्या गारेगार पाण्याला तोड नाही!
३. यावर चिकटलेलं पीठ सहजपणे काढण्यासाठी तारेच्या घासणीचा वापर करू नये. याउलट सॉफ्ट स्पंज किंवा मऊसूत अशा हिरव्या रंगाच्या स्क्रबरचा वापर करावा.
४. स्वच्छ धुवून घेतलेलं पोळपाट लाटणं उन्हांत वाळवून संपूर्णपणे सुकवून घ्यावे. जर आपल्याला धुतल्यानंतर ते लगेच वापरायचे असेल तर गॅसच्या मंद आचेवर धरुन हलक्या उष्णतेवर वाळवून घ्यावे. पोळपाट लाटण्याला थेट गॅसची फेल्म लागणार नाही याची काळजी घ्यावी.
अशा पद्धतीने आपण आपल्या किचनमधील नेहमीच्या वापरातील लाकडी पोळपाट लाटणं अगदी सोप्या पद्धतीने स्वच्छ करु शकतो.