Join us  

तांब्याच्या भांड्यांवर काळे थर आलेत? १ सोपा उपाय, न घासता-न रगडता चकचकीत होतील भांडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 3:05 PM

Solution To Clean Copper and Brass Utensils : हवा आणि मॉईश्चरच्या संपर्कात आल्यामुळे तांब्यासारखे धातू आपली चमक कमी  करतात.

पितळ आणि तांब्याची भांडी स्वंयपाकघराची शोभा वाढवतात. किचनमध्ये एलिंगेंस आणि टापटिपपणा हा भांड्यांमुळे असतो. भांड्यांमध्ये काळेपणा दिसत असेल तर तो काढून टाकण्यासाठी  तुम्ही काही घरगुती उपाय करून पाहू शकतात. हवा आणि मॉईश्चरच्या संपर्कात आल्यामुळे तांब्यासारखे धातू आपली चमक कमी  करतात. ही भांडी साफ करण्यासाठी कोणते उपाय करता येईल ते पाहा. (What Is The Best Way To Clean Brass And Copper Utensils)

रोजच्या वापरात असलेला १ पदार्थ वापरून तुम्ही तांब्याची भांडी स्वच्छ करू शकता. हवा पितळ आणि तांब्याच्या संपर्कात आल्यामुळे या धातुंची ऑक्सिडीकरण होते. पेटिना नावाचा एक थर तयार होतो. ज्यामुळे भांडी काळी दिसू लागतात. तांबे आणि पितळाची भांडी तुम्ही टुथपेस्टने साफ करू शकतात. 

तरूण्यातच हाडं खिळखिळी करते व्हिटामीन बी १२ ची कमी; ५ पदार्थ खा-मिळवा मजबूत हाडं

हा सरळ आणि प्रभावी उपाय आहे. डाग काढून टाकण्यासाठी आणि चमक येण्यासाठी टुथपेस्ट उत्तम ठरते. यामुळे धातूला चमक येते. स्टेप बाय  स्टेप प्रोसेस करून तुम्ही भांडी सहज स्वच्छ करू शकता. हा उपाय  करण्यासाठी तुम्हाला पांढरी टुथपेस्ट, मुलायम कापड आणि स्पंज घ्या, मीठ, पाणी हे साहित्य तुम्हाला लागेल.

पितळ आणि तांब्याची भांडी टुथपेस्टने कशी स्वच्छ करावी?

सगळ्यात आधी अशा टुथपेस्टची निवड करा ज्यात मायक्रोबीड्स नसतील. पांढरी साधी टुथपेस्ट जास्त असेल असे पाहा.  भांड्यावरील घाण काढून  टाकण्यासाठी तांबे आणि पितळाची भांडी  वाहत्या  पाण्यात धुवा. एका छोट्या वाटीत अर्धा चमचा मीठ, टुथपेस्ट आणि लिक्विड डिश सोप आणि त्यात थोडं पाणी घालून एक घट्ट मिश्रण तयार करा. त्यानंतर हे घट्ट मिश्रण भांड्यांना लावून स्पंजच्या मदतीने भांडी घासून स्वच्छ करा.  

दातांच्या मध्यभागी किड-वरून पिळवे झाले? किचनमधल्या ३ वस्तू लावा, किड निघेल-स्वच्छ होतील दातभांड्यांवरचे डाग  हट्टी असतील आणि अनेकदा रगडल्यानंतरही डाग निघत नसतील तर काही वेळासाठी तसंच सोडून द्या. काहीवेळानंतर स्पंजच्या मदतीने भांडी आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूंनी स्वच्छ करा. तांबे आणि पितळाची भांडी एका स्वच्छ कापडाने  क्लिन करा. यामुळे धातूची नैसर्गिक  चमक परत येईल. भांड्यांची चमक परत आणण्यासाठी  पॉलिश करणं महत्वाचे आहे.  हाताला थोडं तेल लावून पुन्हा भांडी स्वच्छ करा. 

तांब्या पितळाची भांडी घासताना या गोष्टी लक्षात ठेवा

अशा धातूंवर खूप लवकर स्क्रॅच  पडतात अशावेळी केमिकल्सयुक्त साबण भांडी लवकर खराब करू शकतात. धातूंवर स्क्रॅच पडू नये यासाठी मऊ, मुलायम कापड किंवा स्पंजचा वापर करा. पॅच टेस्ट फक्त स्किनची नाही तर भांड्याचीही करू शकता. यामुळे भांड्याना चमक येईल. भांड्याना साबण किंवा शॅम्पू लावा त्यानंतर जर भांडी खराब झाली नाही तर याचा वापर करून भांडी स्वच्छ करू शकता.  मळलेली भांडी स्वच्छ नेहमी स्वच्छ कापडानेच क्लिन करा. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियाकिचन टिप्स