Join us  

घरातल्या तुळशीची वाढच होत नाही? करा ३ उपाय, तुळस वाढेल जोमाने-होईल डेरेदार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 7:16 PM

What is the best way to grow Tulsi plant : अनेकदा हिवाळा आणि पावसाळ्याच्या दिवसातही तुळस सुकते. तुळशीच्या झाडाला जास्त काळजी घेण्याची गरज असते कारण हे एक ट्रॉपिकल प्लांट आहे.

तुळशीला घरोघर अनन्यसाधारण महत्व आहे. आयुर्वेदातही तुळशीला एक औषधी वनस्पती असल्याचं सांगितलं गेलं आहे. आयुर्वेदानुसार तुळशीचे अनेक फायदे आहेत. (How to Plant, Grow Harvest Basil) तुळशीचं झाड प्रत्येक घरात असतं. उन्हाळ्याच्या दिवसात तुळस खूपच लवकर सुकते. तुळशीची पानं सुकण्याची अनेक कारणं असू शकतात. तुळशीची पानं उन्हाळामुळे सुकतात असं काहीजणांचं मत आहे. (What is the best way to grow Tulsi plant)

अनेकदा हिवाळा आणि पावसाळ्याच्या दिवसातही तुळस सुकते. तुळशीच्या झाडाला जास्त काळजी घेण्याची गरज असते कारण हे एक ट्रॉपिकल प्लांट आहे. म्हणूनच तुळशीच्या झाडाला कमी पाणी, कमी ऊन आणि कमी हवा लागते. जर ते झाड सुकलं तर पुन्हा काही उपाय करून हिरवंगार करता येऊ शकतं. (Home Gardening Tips)

सुकलेल्या तुळशीच्या झाडासाठी कडुलिंब फायदेशीर

जर घरातलं तुळशीचं झाडं पूर्णपणे सुकलं असेल आणि पुन्हा बहरलेलं दिसावं असं वाटत असेल तर  एक सोपा उपाय फायदेशीर ठरू शकतो.  कडुलिंबाची पानं सुकवून २ चमचे पावडर  तुळशीत घाला. ही पावडर तुळशीत व्यवस्थित एकत्र करून घ्या. असं केल्यानं तुळशीचं झाडं भराभर वाढेल.

ऑक्सिजन गरजेचा

पावसाळ्याच्या दिवसात तुळशीच्या झाडात भरपूर पाणी जमा होतं. यामुळे तुळशीच्या झाडाची पानं गळायला सुरूवात होते कारण  झाडाला जास्त मॉईश्चर मिळते. यामुळे झाडं व्यवस्थित श्वास घेऊ शकत नाहीत. यामुळे हळूहळून तुळशीची पानं सुकायला लागतात.  झाडापासून १५ सेमी अंतरावर माती २० सेमी खोलीपर्यंत खोदली असता, जमिनीत ओलावा असल्याचे दिसून येईल. असे झाल्यास, त्यात कोरडी माती आणि वाळू भरा, ज्यामुळे झाडाची मुळे पुन्हा श्वास घेऊ लागतील.

कडुलिंबाच्या बियांची पावडर

अधिक मॉईश्चरमुळे तुळशीच्या झाडामध्ये फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. ही समस्या दूर करण्यासाठी नीम खली पावडर  तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होतील. याला नीम सिड पावडर असंही म्हणतात. १५ ग्राम पावडर मातीत मिसळल्यास फंगल इंफेक्शन दूर होण्यास मदत होते. जर तुमच्याकडे ही पावडर नसेल तर घरीच कडुलिंबाची पानं पाण्यात उकळून घ्या. पाणी हिरवं झाल्यानंतर थंड करून बॉटलमध्ये भरा. दर १५  दिवसातून एकदा खुरपणी यंत्रानं माती खोदा त्यात २ चमचे हे पाणी घाला. हे सोपे उपाय केल्यानं तुळस पुन्हा बहरलेली दिसेल. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया