उन्हाच्या झळा फक्त घराबाहेरच नसून, किचनमध्येही बसतात (Summer Special). बहुतांश घरातील किचन जास्त मोठे नसते. त्या किचनमध्ये भांडी, फ्रिज, हंडा, कळशी यासह इतर साहित्य असतात (Kitchen Tips). ज्यामुळे किचन भरल्याभरल्यासारखे वाटते. अशा परिस्थितीत किचनमध्ये हवेचा शिरकाव होण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. मुख्य म्हणजे गृहिणीला याचा अधिक त्रास होतो.
गॅसमधून निघणारी धगधगती आग, व जेवण बनवत असताना त्यातून निघणारी वाफ, या सगळ्या गोष्टींमुळे गृहिणींच्या शरीराची लाही लाही होते. गॅस चालू असल्यामुळे आपण फॅन देखील चालू करू शकत नाही. या धगधगत्या उन्हात स्वयंपाक करणं कठीण जाते. जर आपल्याला स्वयंपाक वेळेवर आटोपायचं असेल तर, ४ टिप्स फॉलो करून पाहा. उन्हाच्या झळा न बसता, स्वयंपाक झटपट तयार होईल(What is the best way to keep the kitchen cool in Summer).
खाण्याच्या सवयींमुळे भारतीय आजारी पडतात! ICMR च्या तज्ज्ञांनी सांगितलं, सतत आजारपण नको तर..
स्वयंपाक करण्याची योजना आखा
उन्हळ्यात लोक हलके पदार्थ खाण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे किचनमध्ये तासंतास उभं राहून, स्वयंपाक करण्यापेक्षा आपण साधे पदार्थ तयार करू शकता. जे झटपट तयार होतील. स्वयंपाक करण्यापूर्वी साहित्य रेडी करून ठेवा. यामुळे स्वयंपाक झटपट तयार होईल.
इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करा
सध्या तंत्रज्ञानाचे युग आहे आणि प्रत्येक कामासाठी उपकरणांचा वापर होतो. ज्यामुळे आपले काम सोपे होते. शिवाय वेळेचीही बचत होते. आपण स्वयंपाक करण्यासाठी विविध उपकरणांची मदत घेऊ शकते. यामुळे स्वयंपाक झटपट तयार होईल. शिवाय उष्णतेचाही त्रास होणार नाही.
मग - बादली फुटली? पाणी गळून वाया जातं? चमचाभर बेकिंग सोड्याचा सोपा उपाय- फेकून देण्याची गरजच नाही..
एक्झॉस्ट फॅनचा वापर करा
अनेक घरात एक्झॉस्ट फॅन असते. एक्झॉस्ट फॅनमुळे घरातील गरम हवा बाहेर फेकली जाते. ज्यामुळे खोलीमध्ये हवा खेळती राहते. आपण किचनमध्ये एक्झॉस्ट फॅन लावू शकता. यामुळे किचनमध्ये हवा सर्क्युलेट होत राहील. शिवाय उष्णतेमुळे गुदमरल्यासारखे वाटणार नाही.
किचनमध्ये लावा टेबल फॅन
उन्हाळ्याच्या दिवसात टेबल फॅनमुळे किचन थंड राहू शकते. किचनमध्ये सिलिंग फॅन असेल तरी देखील टेबल फॅन ठेवा. कारण सिलिंग फॅनमुळे गॅस कमी होते, किंवा विझते. त्यामुळे टेबल फॅन लावा. यामुळे किचनचे वातावरण थंड राहू शकते.