Join us  

नारळाचे तेल उत्तम कोणतं? रिफाईंड की अन-रिफाईंड, त्यात फरक काय? कोणतं तेल कधी वापरायचं, आणि चुकलं तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2022 4:55 PM

Refined and Unrefined Oil: स्वयंपाकापासून ते अगदी स्किन आणि हेअर केअरपर्यंत नारळाच्या तेलाचा वापर करता येतो. पण कोणतं नारळाचं तेल कशासाठी वापरायचे, नारळाच्या रिफाईंड आणि अन रिफाईंड तेलात नेमका काय फरक, हे जाणून घेण्यासाठी वाचा ही माहिती.. 

ठळक मुद्देनारळाचं तेल कसं काढलं आहे आणि त्याच्यावर कशा पद्धतीने प्रक्रिया करण्यात आली आहे, या गोष्टी त्या तेलाला सुवास आणि चव देण्यासाठी कारणीभूत ठरतात. 

स्वयंपाकासाठी किंवा अगदी त्वचेची मसाज करण्यासाठी, केसांसाठी तुम्हाला नारळाचे तेल वापरायचे असेल, तर नारळ तेलाबाबत या काही बेसिक गोष्टींची माहिती तुम्हाला असलीच पाहिजे. त्यामुळेच तर रिफाईंड तेल घ्यायचे की अन रिफाईंड, आपला वापर कसा आहे (When to Use Refined and Unrefined Oil?), त्यानुसार आपल्याला कोणते तेल घेण्याची आवश्यकता आहे, हे आपण ठरवू शकतो. 

 

रिफाईंड आणि अन रिफाईंड नारळ तेलातला फरक..difference between refined and unrefined coconut oil- रिफाईंड आणि अन रिफाईंड तेलातला सगळ्यात मुख्य फरक म्हणजे त्याच्यावर कशी प्रक्रिया केलेली आहे आणि ते तेल बनविण्यासाठी नारळाचा नेमका कोणता भाग वापरण्यात आलेला आहे.. नारळाचं तेल कसं काढलं आहे आणि त्याच्यावर कशा पद्धतीने प्रक्रिया करण्यात आली आहे, या गोष्टी त्या तेलाला सुवास आणि चव देण्यासाठी कारणीभूत ठरतात. 

 

अनरिफाईंड नारळ तेलWhat is unrefined coconut oil?- अनरिफाईंड नारळ तेलाला व्हर्जिन किंवा एक्स्ट्रा व्हर्जिन तेल असंही म्हणतात. नारळाच्या ताज्या गरापासून प्रेसिंग पद्धत वापरून हे तेल तयार केलं जातं. ड्राय आणि वेट असे प्रेसिंग पद्धतीचे दोन प्रकार आहेत. ड्राय प्रकारात तेल काढण्यासाठी उष्णतेचा वापर केला जातो तर वेट प्रकारात मशिनरीच्या साहाय्याने तेल काढले जाते. - जेव्हा तुम्ही बाजारातून नारळाचं अनरिफाईंड तेल आणता तेव्हा त्या बाटलीवरही expeller-pressed किंवा cold-pressed असे लेबल असते. ज्या बाटलीवर expeller-pressed असं लेबल लिहिलेलं असतं, त्याचा अर्थ असा की ते तेल उष्णता देऊन काढण्यात आलेलं आहे. तसेच ज्या बाटल्यांवर cold-pressed असं लिहिलेलं असते, ते तेल काढताना उष्णतेचा वापर करणं टाळलं जातं. त्यामुळे cold-pressed तेलात जास्त प्रमाणात पोषणमुल्य असतं असं मानलं जातं. - अनरिफाईंड नारळ तेलाचा स्माेक पॉईंट इतर तेलाच्या तुलनेत कमी असतो, पण त्याचा वास खूप स्ट्राँग असतो. जर एखाद्या थंड, खूप सुर्यप्रकाश न येणाऱ्या जागी हे तेल व्यवस्थित साठवून ठेवलं तर ते अगदी २ ते ३ वर्ष फ्रेश राहू शकतं. 

 

रिफाईंड नारळ तेलWhat is Refined coconut oil?सुकलेल्या नारळपासून रिफाईंड नारळ तेल तयार करतात. मशिननी दाब देऊन तेल काढलं जातं. या तेलाचा वास काढून टाकण्यासाठीही त्याच्यावर उष्णता देऊन प्रक्रिया केली जाते. त्यानंतर ते ब्लिच केलं जातं आणि त्यातील घाण काढून टाकण्यासाठी त्याचं फिल्टरेशनही होतं. अशा पद्धतीने तेलावर प्रक्रिया केली जाणं हा रिफाईंड आणि अन रिफाईंड तेलातला सगळ्यात मुख्य फरक आहे. रिफाईंड नारळ तेल काही महिन्यांसाठीच आपण साठवून ठेवू शकतो. त्यानंतर ते खराब होते.  

 

रिफाईंड आणि अनरिफाईंड तेलाचा कसा वापर करायचा?- बेकींग प्रक्रियेमध्ये रिफाईंड आणि अनरिफाईंड नारळ तेलाचा वापर करता येतो. केक, कपकेस या रेसिपींमधे तेलाचा वास उग्र नसावा. त्यामुळ त्या रेसिपींसाठी रिफाईंड तेल वापरा. याउलट कोकोनट रम बनाना ब्रेड यासारख्या काही रेसिपींमध्ये नारळाचा फ्लेवर येण्यासाठी आवर्जून अनरिफाईंड तेलाचा वापर केला जातो. - तळण्यासाठी रिफाईंड तेल वापरणे योग्य. - नारळाचा स्ट्राँग वास असल्याने सूप, भाज्यांची ग्रेवी यासाठी अनरिफाईंड तेल वापरावे.- केस आणि त्वचेसाठी अनरिफाईंड तेल वापरणे अधिक पोषक ठरते. त्यातली कोल्ड प्रेस्ड वापरणे जास्त उत्तम.   

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियातेल शुद्धिकरण प्रकल्प