Join us  

स्वच्छ पुसूनही फरशी काळी दिसते? लादी पुसण्याच्या पाण्यात ३ पदार्थ मिसळा; चमकेल लादी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 10:22 AM

(What is the fastest way to clean tile floors : घर स्वच्छ, फ्रेश दिसण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. जेणेकरून फरश्यांवरील बॅक्टेरियाज दूर होण्यास मदत होईल आणि दुर्गंधीही येणार नाही.

स्वच्छ सुंदर घर राहण्यासाठी फरश्या क्लिन असणंही गरजेचं असतं. पण पावसाळ्याच्या दिवसात फरश्या स्वच्छ पुसल्यानंतरही चिकट, अस्वच्छ दिसतात.  रोज डाग पडून फरश्या काळपट पडतात. लादी पुसण्याच्या पाण्यात काही पदार्थ मिसळले तर ही समस्या टळू शकते. (What's the best way to clean tile floors) अनेकदा क्लिनिंग एजंट्समधील केमिकल्समुळे फरश्यांची चमक कमी होते आणि चिकट होतात. (How to Clean Tile Floor) घर स्वच्छ, फ्रेश दिसण्यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया. जेणेकरून फरश्यांवरील बॅक्टेरियाज दूर होण्यास मदत होईल आणि दुर्गंधीही येणार नाही. (What is the fastest way to clean tile floors)

व्हाईट व्हिनेगर

व्हिनेगर एक नॅच्युरल डिस्इन्फेक्ट आहे आहे. ज्याचा वापर फरश्या स्वच्छ करण्यासाठी केला जातो. पण अनेकांना व्हिनेगरचा वास अजिबात आवडत नाही.  म्हणूनच वेगळ्या पद्धतीचा वापर करून तुम्ही फरश्या स्वच्छ करू शकता. सगळ्यात आधी  गरम पाण्यात १ कप व्हिनेगर मिसळा. दुर्गंध घालवण्यासाठी तुम्ही त्यात इसेंशियल  ऑइल मिसळू शकता. 

बेकींग सोडा

कुकींग आणि बेकिंग व्यतिरिक्त साफसफाईसाठीसुद्धा बेकींग सोड्याचा वापर केला जातो. फरश्या क्लन करण्यासाठी बेकींग सोडा हा उत्तम पर्याय आहे. अर्धी बादली पाण्यात अर्धा कप बेकींग सोडा घालून पुसल्यानं चमक परत येण्यास मदत होते.

लिक्वीड सोप आणि डिश वॉशर

भांडी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही डिश वॉशर सोपचा वापर करू शकता. याच्या मदतीनं फरशीवर चमक येण्यास मदत होते. यासाठी पाण्यात व्हिनेगर किंवा बेकींग सोडा मिसळून डिश वॉशर किंवा लिक्वीड सोपचा वापर करा. एक बादली पाण्यात २ चमचे डिश वॉशर घाला आणि व्हिनेगर मिसळा आणि मग लादी पुसा. या उपायानं तुम्ही टाईल्स, ब्रिक किंवा लाकूडही स्वच्छ करू शकता. पावसाळ्याच्या दिवसात माश्या घरात येतात. अशावेळी लादी पुसण्याच्या पाण्यात कडुलिंबाची पानं किंवा या पानाचं रस  दोन ते तीन थेंब घातल्यास फरक जाणवेल.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससुंदर गृहनियोजनकिचन टिप्स