Join us  

तुमच्या टुथपेस्टच्या पाकिटावर कोणत्या रंगाचं मार्किंग आहे? त्याचा काय अर्थ- कोणतं टुथपेस्ट वापरावं, बघा.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2024 1:36 PM

Meaning Of Marking On Toothpaste: टुथपेस्टच्या खालच्या भागावर एक मार्किंग असतं. त्या मार्किंगच्या रंगानुसार त्याचा काय अर्थ आहे, हे एकदा समजून घ्यायलाच पाहिजे...

ठळक मुद्देटुथपेस्टवर एक मार्किंग असतं आणि त्याचा काहीतरी अर्थही असतो, हे काही अपवाद सोडल्यास बहुतांश लोकांना माहितीही नसतं.

आपल्या घरात अशा कित्येक वस्तू असतात, ज्या आपण वर्षांनुवर्षांपासून वापरत आलेलो असतो. पण त्यांच्यावरचा मजकूर आपण कधीही बारकाईने वाचलेला नसतो. वर वर आपण तो फक्त बघितलेला असतो. पण तो व्यवस्थित वाचणे, त्याचा अर्थ जाणून घेणे आपल्याला गरजेचेही वाटत नाही. आता हेच बघा ना टुथपेस्ट ही आपली अगदी रोजची अतिशय गरजेची वस्तू. तिच्याशिवाय आपला दिवसच सुरू होत नाही, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पण या टुथपेस्टवर एक मार्किंग असतं आणि त्याचा काहीतरी अर्थही असतो, हे काही अपवाद सोडल्यास बहुतांश लोकांना माहितीही नसतं. ते मार्किंग नेमकं काय आणि त्याचा रंग आपल्याला काय सांगतो, हे एकदा बघूया... (What is the meaning of blue, red, green and black marking on toothpaste?)

 

टुथपेस्टच्या पाकिटावर असणाऱ्या मार्किंगचा अर्थ काय?

टुथपेस्टच्या पाकिटावर असणाऱ्या मार्किंगचा अर्थ काय आणि कोणत्या रंगाच्या मार्किंगचा काय अर्थ असतो, याविषयीचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहेत.

१० वी- १२ वीची परीक्षा आली, बघा कोणत्या वेळी अभ्यास केल्यावर अधिक पाठांतर होऊ शकते

त्यानुसार जर तुमच्या टुथपेस्टवर काळ्या रंगाचं मार्किंग असेल तर त्याचा अर्थ असा की ते टुथपेस्ट पुर्णपणे केमिकल्सपासून तयार झालेलं आहे. जर तुमच्या टुथपेस्टवर लाल निळ्या रंगाचं मार्किंग असेल तर ते टुथपेस्ट काही नैसर्गिक घटक आणि काही औषधी वापरून तयार केलेलं आहे.

ऐकलं का कधी 'पोमॅटो'चं झाड? तरुणाचा भन्नाट प्रयोग, अंगणात लावलं बटाटे आणि टोमॅटो देणारं एकच झाड

हिरव्या रंगाचं मार्किंग असणारं टुथपेस्ट पुर्णपणे नैसर्गिक घटकांपासून तयार केलेलं आहे. तर लाल रंगाचं मार्किंग असणारं टुथपेस्ट काही नैसर्गिक घटक आणि काही केमिकल्स वापरून तयार केलेलं आहे. 

 

पण silverhilldental.com यांनी प्रकाशित केलेल्या माहितीनुसार टुथपेस्टवर असणारं रंगाचं मार्किंग आणि त्यामध्ये असणारे घटक यांचा काहीही संबंध नसतो.

कम्प्युटरवर काम करून, दुचाकी चालवून मान खूप दुखते? ६ व्यायाम करा, लगेच मिळेल आराम

त्या टुथपेस्टच्या निर्मिती प्रक्रियेदरम्यान त्यांच्यावर ते मार्किंग केलेले असते. आणि तो एकप्रकारचा बारकोड असून केवळ लाईट सेन्सर मशिन्सद्वारे तो वाचता येतो. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलदातांची काळजी