Join us  

टेक्स्टॉव्हर्ट म्हणजे काय? आपणही कॉल कमी टेक्स्टचा वापर जास्त करत असाल तर ४ चुका टाळा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2024 9:52 AM

What is the meaning of "Textrovert"? Are you a textrovert? : जर आपल्याला भेट आणि कॉलपेक्षा टेक्स्ट सोयीस्कर असेल तर, ४ गोष्टी लक्षात ठेवा

डिजिटल युगात आता सर्व काही शक्य झालं आहे (Textrovert). व्हॉईससह लोक एकमेकांना पाहू देखील शकत आहेत. जस जसं यंत्राचा वापर वाढला आहे. तस तसं माणसांच्या वागणुकीतही बदल घडत आहेत (Texting). एक्सट्रोव्हर्ट आणि इंट्रोव्हर्टबद्दल आपल्याला ठाऊक असेलच. पण आपल्याला टेक्स्टॉव्हर्टबद्दल माहिती होती का? काही लोक कॉलवर कमी, टेक्स्टवर जास्त बोलतात, तर काही जण टेक्स्टवर कमी कॉलवर बोलण्यात कंर्फटेबल असतात(What is the meaning of "Textrovert"? Are you a textrovert?).

परंतु, आजकाल अधिक लोक टेक्स्टचा वापर करताना दिसत आहेत. स्टेटिस्टाच्या रिपोर्टनुसार, 'भारतीय एका दिवसात सुमारे १४० अब्ज संदेश पाठवतात. यातून आपल्याला कळालं असेल लोक टेक्स्टचा किती वापर करतात. बऱ्याच जणांवर टेक्स्टचा इतका प्रभाव पडला आहे की, ते लोक आपल्या भावना टेक्स्टमध्ये उतरवतात. यातून समोरच्या व्यक्तिचं व्यक्तिमत्व देखील कळून येतं. जर आपणही टेक्स्टॉव्हर्ट असाल तर, संवादाच्या वेळेस कोणत्या चुका टाळायला हव्या. पाहा.

मजकूर लहान ठेवा

टेक्स्ट पाठवताना काही लोक भावनेच्या भरात भरभरून लिहितात. ज्यामुळे बऱ्याचदा मुख्य मुद्दा बाजूला राहतो. जर आपल्याला बऱ्याच गोष्टी शेअर करायच्या असतील तर, लहान पण अनेक मजकुरात पाठवा. जेणेकरून रिसीव्हरला वाचणे सोपे होईल. 

लठ्ठपणा ते ब्लड प्रेशर; पोहे खाण्याचे हे ७ आरोग्यदायी फायदे आपल्याला ठाऊक आहेत का?

संवेदशील मजकूर टेक्स्टद्वारे पाठवणं टाळा

प्रत्येक गोष्ट टेक्स्टद्वारे सांगता येत नाही. टेक्स्ट आणि भेट किंवा कॉलद्वारे गोष्ट सांगणे वेगळे. बऱ्याचदा टेक्स्टद्वारे समोरच्या व्यक्तीला चुकीचा संदेशही जाऊ शकतो. किंवा महत्वाची गोष्ट टेक्स्टद्वारे सांगणं टाळा. उदाहरणार्थ कुणाशी संबंध तोडणे, कुणाला नोकरीवरून काढून टाकणे, कुणाच्या मृत्यूची बातमी किंवा अन्य संवेदनशील माहिती मजकूराद्वारे पाठवू नये.

चुकीच्या वेळेस मजकूर पाठवू नका

मजकूर पाठवताना काही लोक वेळेचा मागोवा घेत नाहीत. समोरचा व्यक्ति त्या वेळेत आपल्यासोबत संवाद साधण्यास उपलब्ध असेल का? हे पाहा. मध्यरात्री किंवा पहाटे मेसेज करणे टाळा. वेळ - काळ  पाहूनच मेसेज करा.

सुनील शेट्टी सांगतो ३ नियम, वयासोबत फिटनेसही वाढेल आणि आजार जवळपास फिरकणार नाहीत

कॉमन एब्रिविएशन

सध्या लोक कॉमन एब्रिविएशनचा वापर चॅटिंगदरम्यान करीत आहेत. LOL-लाफ आउट लाउड, IDK आई डोन्ट नो, FYI फॉर योर काइंड इन्फोर्मेशन, TTYL टॉक टू यू लेटर, LMK लेट मी नो यांसारखे अनेक एब्रिविएशनचा वापर लोक करतात. पण जर याची आपल्याला माहिती नसेल तर, एब्रिविएशन वापरणं टाळा. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया