घराच्या इतर खोल्यांप्रमाणेच स्वंयपाकघरही स्वच्छ असणं महत्वाचं असतं. किचनची साफ सफाई करायचं म्हटलं की फक्त फरश्या, भिंती, भांड्याची स्वच्छता केली जाते. (How to Clean Gas Stove Burners With Vinegar and Baking) ही स्वच्छता करत असताना गॅस ओटा आणि शेगडीचे लहान लहान भाग साफ करायचे राहून जातात रोज स्वयंपाकासाठी लागणारे गॅस बर्नर आतमध्ये घाण, कचरा शिरून काळपट दिसतात आणि फ्लेमसु्दधा कमी होते. गॅस वरवर साफ केला जातो त्यामुळे बर्नर तसेच अस्वच्छ दिसतात. (Cleaning Hacks)
गॅस बर्नर रोज स्वच्छ करणं शक्य नसलं तरी महिन्यातून एकदा साफसफाई करायलाच हवी. अन्यथा फ्लेम कमी होणं, गॅस लिक होणं, गॅसमधून वास येणं असे त्रास उद्भवतात. अशावेळी पैसे खर्च करून गॅस बर्नर ठिक करावे लागतात. काही सोप्या टिप्स गॅस बर्नर साफ करण्यासाठी आणि पुन्हा नव्यासारखे गॅस बर्नर दिसण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. (How to clean gas burger)
ईनोने साफ करा
इनोचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. फरश्या स्वच्छ करण्यासाठी आणि गॅस बर्नर स्वच्छ करण्यासाठीही इनो तुम्ही वापरू शकता. इनोने गॅस बर्नर स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार नाही.
साहित्य
१/२ वाटी गरम पाणी, १ मोठा चमचा लिंबू, १ पाकीट ईनो, १ छोटा चम्मच लिक्विड डिटर्जेंट, १ जुना टूथ ब्रश.
सर्व प्रथम, आपल्याला एका भांड्यात गरम पाणी घ्यावे लागेल. यानंतर पाण्यात लिंबाचा रस आणि एनो टाका. भांडे 15 मिनिटे झाकून ठेवा. या पाण्यानं बर्नर घासून घ्या. 15 मिनिटांनंतर बर्नरकडे पहाल तेव्हा ते जवळजवळ स्वच्छ होईल. जर थोडा कचरा शिल्लक राहिला तर तुम्ही टूथब्रशला लिक्विड डिटर्जंट लावून ते स्वच्छ करू शकता. गॅस बर्नर दर 15 दिवसांनी स्वच्छ केला तर तुम्हाला तो ब्रशनेही स्वच्छ करण्याची गरज भासणार नाही.
लिंबाचे साल आणि मीठ
लिंबाने भांडी नवीन सारखी चमकता येतात. विशेषत: पितळेची भांडी. जर गॅस बर्नर पितळेचा बनलेला असेल तर तुम्ही ते लिंबानेही स्वच्छ करू शकता. सगळ्यात आधी रात्री झोपण्यापूर्वी गॅस बर्नर लिंबाचा रस मिसळलेल्या गरम पाण्यात बुडवावा. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच लिंबाच्या सालीला मीठ लावून बर्नर स्वच्छ करा. बर्नर 2 मिनिटांत चमकू लागेल. दर 15 दिवसांनी ही पद्धत अवलंबून तुम्ही गॅस बर्नर साफ करू शकता.