Join us  

नुकतंच लग्न झालेल्या तरुणी गुगलवर काय सर्च करतात? डेटाच सांगतोय सर्च की कहानी..

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 4:53 PM

What Married Women Search Most on Google : लग्नानंतर बहुतेक महिला गुगलवर काय सर्च करतात. याचे रिजल्ट्स पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.

गेल्या अनेक दशकांपासून गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. जगातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर Google कडे आहे असा लोकांचा विश्वास आहे. एखादी व्यक्ती मोठी असो वा सामान्य माणूस, प्रत्येकजण आपल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी गुगलची मदत घेतो. पण नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये हे ही समोर आले आहे की, लग्नानंतर बहुतेक महिला गुगलवर काय सर्च करतात. याचे रिजल्ट्स पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.(What married women search most on google)

गुगलच्या एका डेटानुसार, विवाहित महिला नवऱ्याला काय आवडते हे शोधण्यासाठी या सर्च इंजिनवर सर्च करतात. लग्नानंतर जगातल्या प्रत्येक स्त्रीला अनेकदा प्रश्न पडतो की तिच्या नवऱ्याला काय आवडतं. याशिवाय पतींची निवड काय आहे आणि त्यांना काय आवडते हे पाहणेही महिलांना आवडते. हा प्रश्न गुगलवर सर्वाधिक सर्च केला जातो. याशिवाय स्त्रिया आपल्या पतीचे मन कसे जिंकायचे, त्यांना कसे आनंदी ठेवायचे याचा शोध घेतात.( you know what newly married girls search the most on google)

जोरू का गुलाम

गुगलवर स्त्रियां काहीवेळा विचित्र प्रश्न विचारतात. या सर्च हिस्ट्रीत  अत्यंत धक्कादायक बाब समोर येतो ती म्हणजे आपल्या पतीला बायकोच्या गळ्यातलं ताईत कसं बनवायचं हे महिला सर्च करतात.  याशिवाय बायका देखील सतत शोध घेतात की लग्नानंतर मुलं होण्याची योग्य वेळ कोणती आहे. सहसा बायकांना हे टेन्शन अनेकदा येतं. सर्च हिस्ट्रीमध्ये काही प्रश्न तुम्ही येथे वाचू शकता.

१) स्त्रियांना हे जाणून घ्यायचे असते की त्यांनी लग्नानंतर त्यांच्या नवीन कुटुंबात कसे वागले पाहिजे, त्या कुटुंबाचा, सासरचा भाग कसा बनू शकतो.

२) लग्नानंतर स्वतःचा व्यवसाय कसा चालवायचा आणि व्यवसायासोबत कुटुंब कसे सांभाळायचे.

३) नवऱ्याला जास्त काय आवडते, पतीचे मन कसे जिंकायचे, पतीला कसे आनंदित करावे.

४) कुटुंब नियोजन कधी करावे, मूल होण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे

५) कुटुंब नियोजनासाठी मी किती काळ वाट पाहावी?

६) तर कामाला जात असलेल्या स्त्रियांनी लग्नानंतर नोकरी कशी सुरू ठेवू शकते किंवा व्यवसायात कसे सामील होऊ शकते असे प्रश्न सर्च केलेलं दिसून आलं.

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियामोबाइल