उन्हाचा पारा सध्या वाढत चालला आहे. सूर्य अक्षरशः आग ओकत आहे (Air Conditioner). पण तरीही कामानिमित्त बाहेर जाणं आपण टाळू शकत नाही. बाहेर पडण्यापूर्वी आपण छत्री किंवा स्वतःला आपण स्कार्फने कव्हर करतो (Summer Special). पण तरीही घामाच्या धारा शरीरातून निघतात. अशावेळी घरी परतल्यानंतर आपण पंखा किंवा एसीखाली बसतो. ज्यामुळे शरीराला काहीसा थंडावा मिळतो.
पण बऱ्याचदा एसी खोली थंड करण्यास विलंब लावते. किंवा एसी चालू असूनही खोली थंड होत नाही. अशावेळी आपण मेकॅनिकला बोलावून एसी रिपेअर करून घेतो. ज्यामुळे यात पैसे देखील अधिक खर्च होतात. पण आपण घरी देखील एसी रिपेअर करू शकता. ते देखील घरच्या घरी(What should I check if the AC is not cooling).
या कारणांमुळे एसी लवकर खोली थंड करत नाही
एसी फिल्टरमध्ये घाण जमा होणे
बऱ्याचदा एसी फिल्टरमध्ये घाण जमा झाल्यामुळे, एसीची कुलिंग कमी होते. खरंतर, एसी फिल्टरमध्ये साचलेल्या घाणीमुळे हवेचा प्रवाह कमी होतो, त्यामुळे जर एसी चालू करूनही, लवकर खोली थंड होत नसेल तर, सर्वप्रथम एसी फिल्टर तपासा. त्यात धूळ साचली असेल तर लगेच स्वच्छ करा. साफसफाई करून एसी चालू केल्यास थंड हवा येऊ लागेल.
दात स्वच्छ घासले तरी पिवळेच दिसतात? चमचाभर हळदीत मिसळून लावा '१' खास तेल, दात चमकतील
कंडेन्सर कॉइलची घाण साफ करा
एसीचे दोन भाग असतात, त्यातील एक भाग घराच्या आत लावला जातो, आणि दुसरा मोठा भाग ज्याला कंडेन्सर कॉइल म्हणतात तो घराबाहेर लावला जातो. ज्यामुळे घरातील गरम हवा बाहेर येते. हा भाग घराच्या बाहेर असल्याने त्यावर भरपूर धूळ आणि घाण साचते, त्यामुळे कंडेन्सर कॉइल खोलीतील गरम हवा योग्य प्रकारे बाहेर फेकत नाही. ज्यामुळे खोली लवकर थंड होत नाही. अशावेळी कंडेन्सर कॉइलमधून धूळ साफ करायला हवी.
एसी मोटर तपासा
जर एसीचे फिल्टर आणि कंडेन्सर कॉइल देखील स्वच्छ असेल आणि तेथे घाण साचलेली नसेल. यानंतरही थंड हवा येत नसेल तर एसी मोटर एकदा मेकॅनिककडून तपासून घ्या.
रिमोट खराब
बरेचदा असे होते की सर्व काही ठीक असते, परंतु तरीही एसी नीट काम करत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा रिमोटही एकदा तपासून घ्यायला हवा. बऱ्याचदा अनेक वेळा रिमोटचे बटण नीट काम करत नसल्याने टेम्प्रेचर बदलण्यात अडचण येते. त्यामुळे रिमोटही तपासा.