सध्याच्या काळात लोकांमध्ये स्पर्धा वाढत चालली आहे. शाळेत असो किंवा कामात, अनेक जण आपले कौशल्य दाखवून करिअरची शिडी चढत आहे. अनेकांना स्वतःला सिद्ध करायचे आहे तर, काहींना जॉब करून घरच्यांना हातभार लावायचा आहे. तर, काही लोकं कमी वयातच घरातील आर्थिक बाजू सांभाळत आहे. आपण पाहिलं असेल, घरातील नातेवाईक मुलगा किंवा मुलगी मोठी झाल्यानंतर आपल्या करिअरविषयी विचारपूस करतात.
'कामाला जातोस/जातेस की नाही?', 'पगार किती आहे तुला?' असे प्रश्न विचारतात. शिवाय 'लग्न कधी करणार?' हा देखील कॉमन प्रश्न आहे. पण 'कामाला जातोस/जातेस तर किती पगार मिळतो?' हा प्रश्न हमखास विचारला जातो. अशावेळी नातेवाईकांना काय उत्तर द्यायचं असा प्रश्न निर्माण होतो. जर नातेवाईक वारंवार हा प्रश्न विचारून त्रास देत असतील तर, त्यांना सणसणीत उत्तर द्यायला हवे. अशा वेळी आयएएसचे संस्थापक डॉ. विकास दिव्यकीर्ती (Vikas Divyakirti) यांनी दिलेलं उत्तर आपल्या नक्कीच मदतीला येईल(What should I say when someone asks about my salary?).
पगार विचारून त्रास देणाऱ्या नातेवाईकांना द्या सणसणीत उत्तर
एका पत्रकाराने आयएएसचे संस्थापक डॉ. विकास दिव्यकीर्ती यांना एक हटके प्रश्न विचारला. त्याने एका कार्यक्रमात, 'जर एखादा नातेवाईक वारंवार पगार विचारत असेल तर त्याला नक्की काय उत्तर द्यावे?'.
यावर उत्तर देत डॉ. विकास दिव्यकीर्ती सांगतात, 'जर तुमचा पगार जास्त असेल, व सॅलरी ऐकून नातेवाईकांना धक्का बसणार असेल तर, न घाबरता आपला पगार सांगा. किंवा पूर्ण पॅकेज सांगा, बोनस वगैरे पकडून इतकी रक्कम खात्यात जमा होते, असेही तुम्ही सांगू शकता. जर नातेवाईकांमध्ये तुमची कॉलर टाईट राहावी असे वाटत असेल तर, त्यांना आपला पगार वाढवूनही सांगू शकता.
सासूबाईंनी अंकितालाच धरले दोषी! सेलिब्रिटी असली तरी सासूरवास आहेच- अंकिता लोखंडेची गोष्ट काय सांगते?
पगार ऐकून ते तुमचं बँकेतील खातं चेक करायला येणार नाहीत. काऱण बरेच नातेवाईक आपल्या मुलांची तुलना तुमच्यासोबत करतात. जर तुमचेही नातेवाईक पगार ऐकून कंपेयर करत असतील तर, त्यांना आपला पगार जरा वाढवून सांगा. त्यांना आपला पगार ऐकून आश्चर्याचा धक्का बसायला हवा.'
काही नातेवाईक चांगले असतात, तर काही नातेवाईकांना इतरांच्या मुलांच्या आयुष्यात जास्तच रस असते. ते नेहमी आपल्या मुलांची तुलना इतरांशी करतात. त्यांना आपला मुलगा/मुलगी किती ग्रेट आहे, हे वारंवार सिद्ध करायचे असते. त्यासाठी ते संधीही शोधत असतात. त्यामुळे त्यांना स्वतःशी तुलना करण्याची संधी देऊ नका. वेळ आल्यास सणसणीत उत्तर द्यायला शिका. कारण या सगळ्या गोष्टी मानसिक आरोग्यावरही परिणाम करू शकतात.