स्वयंपाक करणं जितकं सोपे तितकेच कठीण. स्वयंपाकघर म्हटलं की, चिरणं, सोलणं, तळणं अशा सगळ्या क्रिया आल्याच. परंतु, काही गोष्टींची करताना सवय झाली असली तरी काही गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो.(How to get rid of chili burn on skin) कांदा कापल्यानंतर डोळ्यांतून पाणी येणे आणि मिरची चिरल्यानंतर हातांची आग होते. मिरच्या कापल्यानंतर हातात जळजळ जाणवते किंवा मिरच्यांचा तिखटपणा बोटांना चिकटतो. (Natural remedies for hand burn from chili)आपण मिरच्यांचा तिखटपणा हा साबण किंवा पाण्याने काढण्याचा प्रयत्न केला तरी देखील काही परिणाम होत नाही. (Best way to stop chili burn on fingers)हातांचा स्पर्श डोळ्यांना किंवा नाकाला झाला की, जळजळ होऊ लागते. (What to do if hands burn after cutting chilies)जर मिरच्या कापल्यानंतर आपल्या देखील हातांची जळजळ होत असेल तर शेफ पंकजा भदोरिया यांनी काही खास टिप्स दिल्या आहेत. ज्यामुळे आपल्या हातांची जळजळ कमी होईल. (How to stop hand itching after touching green chili)
डिशवॉशमध्ये मिसळा 'हा' पदार्थ, भांडी निघतील चकाचक स्वच्छ, पाहा एकदम भारी सोपी ट्रिक
या टिप्स फॉलो करा
1. मिरच्या कापल्यानंतर जर आपल्या हातावर जळजळ होत असेल तर आपण आपल्या हातांना थोडे तेल लावू शकता. ऑलिव्ह ऑइल, वनस्पती तेल किंवा नारळाचे तेल चांगला परिणाम देते.
2. बेकिंग सोड्याची पेस्ट देखील चांगले काम करेल. ही पेस्ट बनवण्यासाठी गरजेनुसार पाण्यात बेकिंग सोडा घाला. हे हातांना लावा आणि सुकल्यानंतर हात स्वच्छ धुवा.
3. हातांवर होणारी जळजळ कोरफड जेल लावल्याने दूर होते. जर काही वेळ आपल्या हातांवर कोरफड जेल लावल्यास आराम मिळेल.
4. शेफ पंकजा म्हणतात की, मिरच्या कापताना जर हात जळजळत असतील तर पाणी किंवा साबणाचा वापर करण्याऐवजी दुग्धजन्य पदार्थांचा वापर करा. हातांना दूध, दही, लोणी किंवा तूप लावण्याचा प्रयत्न करा. हातांना घासून घ्या आणि नंतर धुवा. मिरचीचा तिखटपणा त्वचेवरुन निघून जाईल.