मोबाईल ही आता प्रत्येकाची गरज झाली आहे. त्यामुळे अगदी आठवी- नववीतल्या विद्यार्थ्यांपासून ते घरातल्या वयस्कर मंडळींपर्यंत प्रत्येकाकडेच आपापला खाजगी मोबाईल असतोच. मोबाईल कुठे पडणार नाही, याची आपण पुरेशी काळजी घेतोच. पण कधीतरी चुकून मोबाईल नेमका पाण्यातच पडतो. आता पाण्यात मोबाईल पडला, म्हणजे तो खराब होणारच असं अनेकांना वाटतं. पण बऱ्याचदा असा पाण्यात पडलेला मोबाईल आपल्याला घरच्याघरी दुरुस्त करता येतो (Home hacks for repairing mobile dropped in water). त्यासाठीच हा एक सोपा उपाय तुमच्या नेहमी लक्षात असू द्या.... (What to do if smartphone or mobile dropped in water)
मोबाईल पाण्यात पडला तर काय करावं?
मोबाईल पाण्यात पडला तर त्यातलं पाणी काढून टाकण्यासाठी काय करावं, याचा उपाय romita_tiwari_17 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
स्मरणशक्ती वाढून मुलांचा मेंदू होईल तल्लख, ५ सोपे ब्रेन गेम- मुलांना शिकवा आणि तुम्हीही करा
मोबाईल जर पाण्यात पडला तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे थोडा वेळ तो सुरू करण्याचा अजिबात प्रयत्न करून नका. तसेच तो चार्जिंगलाही लावू नका.
सगळ्यात आधी तर मोबाईल स्वच्छ जाडसर कपड्याने पुसून घ्या. किमान अर्धा तास तरी मोबाईल त्या जाडसर कोरड्या कपड्यात तसाच गुंडाळलेला राहू द्या. यानंतर काही वेळ मोबाईल उन्हात ठेवून द्या किंवा पंख्याखाली त्याला वाळविण्याचा प्रयत्न करा.
आता एखाद्या तासाने मोबाईल सुरू करा. बऱ्याचदा मोबाईल तर सुरू होतो, पण त्याच्या आत पाणी तसंच राहतं. ते मोबाईलच्या स्किनवर दिसू लागतं. ते पाणी कसं काढून टाकायचं ते आता पाहूया. यासाठी मोबाईल सुरू करा आणि fix my speaker असं गुगल करा. हे ॲप ओपन केल्यानंतर जे बटन येतं ते दाबा.
मान- पाठ खूपच काळवंडली? १ टोमॅटो घेऊन करा सोपा उपाय, काही मिनिटांतच टॅनिंग निघून जाईल
बटन दाबताच मोबाईलमधून आवाज येईल आणि मोबाईलमधलं पाणी बाहेर पडेल.
पण मोबाईल जर सुरूच होत नसेल तर तो आणखी काही तास कडक उन्हात ठेवा आणि त्यानंतर हा उपाय करून पाहा. तरीही मोबाईल सुरूच होत नसेल, तर मात्र तो दुरुस्तीसाठी बाहेरच न्यावा लागेल.