लिफ्ट हल्ली सर्वत्र असतात. गगनचुंबी इमारतीच नाही तर अगदी ५/६ मजली इमारतीतही लिफ्ट असतात. मॉल्स आणि ऑफिसेस, रेल्वे स्टेशन सर्वत्र सर्रास आपण लिफ्ट वापरतो. काही काही जणांना लिफ्टचा फोबिया असतो. जीवही गुदमरतो. आणि चुकून कधी लिफ्ट बंद पडली आणि आपण लिफ्टमध्येच असलो तर त्या कल्पनेनंही अनेकांना भीती वाटते. चुकून असं झालंच की आपण लिफ्टमध्ये असताना लिफ्ट बंद पडली आणि आपण अडकलो तर काय करायचं?(What to Do If You're Trapped in an Elevator).
लिफ्टमध्ये अडकल्यावर काय करावे?
मन शांत ठेवा
लिफ्ट अचानक थांबली, आपण त्यात अडकलो तर अजिबात घाबरू नका. पहिली गोष्ट म्हणजे शांत राहण्याचा प्रयत्न करा. कारण घाबरल्यानंतर आपल्याला काही गोष्टी लवकर सुचत नाही. त्यामुळे घाबरण्याऐवजी शांत राहा. यामुळे आपल्याला बाहेर निघण्याचा नक्कीच कोणता न कोणता मार्ग सापडेल.
साबुदाणा खाल्ल्याने वजन कमी होते की वाढते? साबुदाणा खाण्याची योग्य पद्धत कोणती?
संपर्क साधा
लिफ्टमध्ये नेटवर्क येत असेल तर, जवळच्या व्यक्तीला किंवा गार्डला फोन करून लिफ्ट बंद असल्याची माहिती द्या. याच्या मदतीने तुमची लवकर सुटका होऊ शकते.
इंटरकॉम किंवा आपत्कालीन बटणचा वापर करा
लिफ्टमध्ये सहसा इंटरकॉम किंवा आपत्कालीन बटण असते. जर मोबाईल काम करत नसेल तर, आपत्कालीन बटण दाबा किंवा इंटरकॉम गार्डशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करा.
प्रतीक्षा करा
लिफ्टमधील तांत्रिक बिघाड अनेकदा कमी कालावधीत दुरुस्त केला जाऊ शकतो. म्हणून धीर धरा आणि प्रतीक्षा करा.
वजन कमी करायचंय? मग नियमित ५ मिनिटं उड्या मारा, जंपिंग जॅक करण्याचे ४ फायदे पाहा
पंखा चालू करा
आजकाल लिफ्टमध्ये ओव्हरहेड पंखे बसवले जातात. ते चालू केले तर हवा येत राहील आणि श्वास घेण्यास त्रास होणार नाही.
दरवाजा ठोठावा
जर कोणतेच उपाय काम करत नसेल, तर हळूवारपणे दरवाजा ठोठावा. जेणेकरून बाहेरील व्यक्ती तुम्हाला मदत करू शकेल. व त्यांना कोणीतरी आत अडकले आहे, हे समजून येईल.