आजचा नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजेच दसरा. दसरा किंवा आपला भारतीय कोणताही सण असू दे, या सणांना फुलांचे एक वेगळे महत्व असते. सणवार हे हार, फुलांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी या सगळ्या सणांना आपल्याला देवाला वहायला फुल व हार मोठ्या प्रमाणात लागतात. आजचा दसरा हा सण गोंड्यांच्या फुलांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. दसरा सण जसजसा जवळ येऊ लागतो तसे बाजारांत गोंड्यांच्या फुलांचे ढिग दिसू लागतात. एवढेच नव्हे तर नवरात्रीत नऊ दिवस आपण देवीला हार, फुले, वेण्या, गजरा वाहतो. नऊ दिवस या वाहिलेल्या फुलांचे नंतर नेमके करायचे काय असा प्रश्न आपल्याला पडतो(What to do with old pooja flowers?).
नवरात्री दरम्याने देवीला वाहिलेली हार, फुले, वेण्या हे आपण काहीवेळा निर्माल्य (What To Do With Flowers After Puja) म्हणून फेकून देतो. परंतु या सगळ्या गोष्टी निर्माल्य म्हणून फेकून देण्यापेक्षा आपण त्याचा पुनर्वापर करु शकतो. ही फुल, हार कचऱ्यात फेकून देण्यापेक्षा घरातील इतर महत्वाच्या कामांसाठी याचा वापर करू शकतो. देवाजवळ एकदा वाहिलेले फुल कोमेजून गेल्यावर शक्यतो आपण अशी फुल, हार फेकून देतो. परंतु या कोमेजून गेलेल्या फुलांचा वापर करून आपण इतर महत्वाच्या गोष्टींसाठी (Surprising ways to recycle floral waste at your home) वापरु शकतो. नवरात्री दरम्यान उरलेली फुल, हार, गजरा, वेणी यांना निर्माल्य म्हणून फेकून न देता त्याचा नेमका वापर कसा करावा ते पाहूयात(Reuse of flowers).
नवरात्री दरम्यान जमलेल्या फुलांचा पुनर्वापर नेमका कसा करावा ?
१. ओठांच्या सौंदर्यासाठी :- उरलेल्या गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या काढून या पाकळ्या सुकवून त्याची पावडर बनवू घ्यावी. या पाकळ्यांच्या पावडरमध्ये मध मिसळून या मिश्रणाने ओठांवर मसाज केल्यास ओठ गुलाबी व मऊ होण्यास मदत मिळते. यासोबतच आपण घरगुती फेसपॅकमध्ये देखील या पाकळ्यांची पावडर घालू शकता.
२. त्वचेसाठी वापरा :- गुलाबाच्या किंवा इतर फुलांच्या पाकळ्यांची पावडर बनवून किंवा या पाकळ्या, बेसन, दूध यांचे एकत्रित मिश्रण करून घरच्या घरी फुलांच्या पाकळ्यांचा घरगुती फेसमास्क बनवू शकतो. याचा वापर केल्याने त्वचा मऊ व चमकदार बनते.
३. घर सजवण्यासाठी :- या उरलेल्या फुलांचा वापर करून सणावारांदरम्यान आपण आपले घर देखील सजवू शकतो. एका मोठ्या भांड्यात किंवा फ्लॉवर पॉटमध्ये आपण ही फुल ठेवू शकतो. त्याचबरोबर एकदा वापरलेले मोठे हार आपण घराच्या दाराला तोरण म्हणून लावून देखील सजावट करु शकतो.
४. घर साफसफाईसाठी वापरा :- घराची साफसफाई करताना आपण या फुलांच्या पाकळ्यांचा देखील वापर करू शकतो. लादी पुसताना पाण्यांत आपण या फुलांच्या पाकळ्या देखील घालू शकतो. यामुळे या फुलांचा एक मंद सुगंध घरात दरवळत राहतो.
संगमरवरी देव्हाऱ्यावर तेलकट डाग पडले ? ३ सोपे उपाय, देव्हारा चमकेल नव्यासारखा...
५. धूप म्हणू करा वापर :- घरात किंवा देवाजवळ आपण अनेकदा धूप म्हणून कापूर जाळतो अशावेळी यात फुलांच्या पाकळ्या घातल्यास त्याचा सुंदर सुवास घरात दरवळतो.
६. फ्रेशनर म्हणून असा करा वापर :- या उरलेल्या फुलांचा वापर करून आपण घरात फ्रेशनर्स म्हणून देखील याचा वापर करु शकता. फुलांच्या पाकळ्या काढून त्या पाण्यांत भिजत ठेवाव्यात. त्यानंतर हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरुन आपण घरात, बेडरुममध्ये नॅचरल एअर फ्रेशनर म्हणून स्प्रे करु शकता.
७. अंघोळीच्या पाण्यांत असा करा वापर :- आंघोळीच्या पाण्यांत आपण या पाकळ्या घालू शकता. यामुळे या फुलांच्या सुगंधाने आपल्याला आंघोळ करताना सुवासिक व फ्रेश वाटेल.