पायांतील पायमोजे हे आपण रोजच्या वापरात वापरतोच. जर आपण पायांत रोज श्यूज घालत असाल तर पायांत मोजे घालणे आलेच. हे कापडांचे मोजे दररोज वापरल्याने पायांचे संरक्षण केले जाते. आपण थंडीच्या दिवसात थंडीपासून पायांचे संरक्षण करण्यासाठी पायांत मोजे घालतो. हे मोजे रोज वापरून वापरून काही कालांतराने फाटून जातात. असे फाटके मोजे आपण वापरत नाही. अशावेळी हे मोजे आपण सरळ उचलून कचऱ्यात फेकून देतो. परंतु आपण हे मोजे फेकून न देता त्यांचा इतर कामांसाठी देखील वापर करु शकतो.
रोज वापरून फाटलेले मोजे फेकून देण्यापेक्षा आपण त्यांचा पुनर्वापर करु शकतो. आपण काहीवेळा आपल्या गरजेनुसार अतिशय महागडे मोजे विकत घेतो. या मोज्यांचे कापड ते अतिशय उत्तम दर्जाचे व चांगले असते. असे कापड कितीही वापरले तरीही फाटता फाटत नाही. अशा चांगल्या कपड्यांपासून बनवलेले महागडे मोजे आपल्याला कचऱ्यात फेकून द्यायला नकोसे वाटतात. अशावेळी आपण या मोज्यांचा वापर घरातील इतर कामांसाठी करून त्यांचा पुनर्वापर करु शकतो(What to Do With Old Socks ? 4 Household Uses and More).
फाटलेले मोजे फेकून देण्यापेक्षा त्यांचा असा करा वापर...
१. घरातील छोट्या मोठ्या वस्तूंवरील धूळ झाडून काढण्यासाठी :- घरातील भिंतींवरची धूळ आपण झाडूने झाडून सहज काढू शकतो. परंतु फर्निचरसोबतच इतर सजावटीच्या किंवा शोभेच्या लहान - सहान वस्तूंवरील धूळ काढण्यासाठी मऊ कापडाची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत, आपण आपले जुने मोजे वापरून घरातील वस्तू सहजरित्या स्वच्छ करु शकता. मोजे हे मऊ व वजनाने हलके असतात ज्यामुळे वस्तूंच्या कानाकोपऱ्यातील साफसफाई योग्य प्रकारे केली जाते. तसेच हे मोजे आकाराने लहान असल्यामूळे धूळ स्वच्छ केल्यानंतर ते धुणे देखील सोपे जाते.
वॉशिंग मशिनमधे धुतलेले कपडे एकमेकांत अडकतात, खूप सुरकुत्या पडतात? १ सोपी ट्रिक- बघा जादू...
२. काचेच्या खिडक्या, आरसे स्वच्छ करण्यासाठी :- काचेच्या खिडक्या आणि आरसे स्वच्छ ठेवणे अगदी अवघड काम आहे. कारण त्यावर धूळ फार लवकर जमा होते. अनेकवेळा साफ केल्यानंतरही त्यावर धूळ व पाण्याचे डाग तसेच दिसतात. अशा परिस्थितीत आपल्या घरातील काचेचे आरसे व खिडक्या नेहमी चमकत ठेवण्यासाठी हे मोजे उपयुक्त ठरतात. हे मोजे कापूस, लोकर, स्पॅन्डेक्स सारख्या कापडापासून बनविलेले असल्याने ते काचेवरची धूळ आणि डाग सहजपणे दूर करतात.
खूप आंबट झाले म्हणून दही टाकून देता? १ सोपा उपाय, दही संपेल आणि किचनही होईल चकाचक...
३. कार स्वच्छ करण्यासाठी :- जर आपल्याकडे जुने मोजे असतील तर कार स्वच्छ करण्यासाठी वेगळे कापड शोधण्याची आपल्याला गरज भासणार नाही. कारण कारची काच साफ करून पॉलिश करण्यासाठी जुने मोजे हा एक उत्तम पर्याय आहे. तसेच साफसफाईनंतर गाडीवर किंवा काचांवर कोणत्याही प्रकारची छाप सोडत नाही, यामुळे आपली कार नव्यासारखी चमकू लागते.
पावसाळ्यात घरभर माश्या-लाइटभोवतीचे किडे फिरतात? करा ४ घरगुती उपाय- किटकांचा त्रास कमी...
४. तेलाच्या बाटलीचे कव्हर म्हणून वापरा :- तेलाच्या बाटलीतून तेल गळती ही एक सामान्य समस्या आहे. यामुळे स्वयंपाकघरातील स्लॅब आणि कॅबिनेटवरही डाग पडतात, जे धुळीच्या संपर्कात आल्यानंतर खूप घाण आणि चिकट होतात. यासोबतच तेलाच्या बाटलीवर चिकटपणा येतो. अशा परिस्थितीत जुने किंवा फाटलेले मोजे कापून आपण ही तेलाची बाटली कव्हर म्हणून लावू शकता.