Join us  

बिघडलेले जुने घड्याळ फेकू नका, झटपट तयार करा ४ हटके शो पीस, घराची भिंत दिसेल सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2023 1:29 PM

What to do with Old Wall Clocks : घड्याळ बिघडले की काय करायचं असा प्रश्न पडतो, त्यासाठीच हे हटके उपाय

घड्याळ हे वेळ सांगण्यासाठी वापरले जाणारे उपकरण आहे. प्रत्येक गोष्ट वेळेनुसार करण्याला महत्त्व आहे. आणि हीच वेळ दाखवण्याचं काम घड्याळ करतं. काळानुसार घड्याळामध्ये देखील अनेक बदल घडलेत. सध्या डिजिटल घड्याळाची चर्चा आहे. पण भिंतीवर लावणाऱ्या घड्याळाची गोष्टच वेगळी आहे. अनेक जण आजही भिंतीवर लावणाऱ्या घड्याळाचा वापर करतात. काही लोकं वर्षाला घड्याळ बदलतात.

मग जुन्या घड्याळाचं करायचं काय असा प्रश्न पडतो. किंवा खराब झालेल्या घड्याळाचा वापर काय, त्यातून नवीन गोष्ट काही करता येऊ शकते का? यासाठी आपण शक्कल लढवतो. जर आपल्या घरातील घड्याळ जुने झाले आहे, किंवा खराब झाले असेल, तर त्यापासून या ४ हटके गोष्टी तयार करून पाहा(What to do with Old Wall Clocks).

जुन्या घड्याळातून तयार करा फोटो फ्रेम

घड्याळ जुने झाल्यानंतर आपण सहसा फेकून देतो. जुने घड्याळ फेकून देण्याऐवजी आपण सुंदर फोटो फ्रेम तयार करू शकता. यामुळे आपले घर सुंदर दिसेल, व भिंतही रिकामी दिसणार नाही. यासाठी जुने घड्याळ घ्या, त्याची काच हळुवारपणे काढा. त्यानंतर घड्याळाचे काटे काढा. व आतल्या बाजूस रंगीबेरंगी कागदे चिकटवा. त्यानंतर स्वतःचा किंवा फॅमिलीचा फोटो चिकटवून, काच व्यवस्थित लावा.

कॉलरवरील डागांमुळे व्हाईट शर्ट घालणे टाळताय? २ सोपे उपाय, मेहनत न घेता-काही मिनिटात कॉलर चकाचक

जुन्या घड्याळाच्या मदतीने मुलांना शिकवा

जुन्या घड्याळाच्या मदतीने आपण मुलांना शिकवूही शकता. घड्याळाच्या आत प्राणी, झाडे, फळे आणि रंग इत्यादींची चित्रे चिटकवून त्यांना शिकवा. या युक्तीने मुलांना शिकवल्यास, मुलं आनंदाने शिकतील.

जुन्या घड्याळ्याला पेंटिंगने द्या न्यू लूक

जुन्या घड्याळ्याच्या आत पेंटिंग चिटकवून न्यू लूक देऊ शकता. यासाठी सुंदर पेटिंग तयार करा. व घड्याळ्याच्या आकाराप्रमाणे गोलाकार कट करा. घड्याळ्यातील काटे बाहेर काढा, व त्याच्या आत पेटिंग व्यवस्थित चिटकवा. त्यानंतर घड्याळ भिंतीवर लटकवा.

फक्त ५ रुपयांचा बेकिंग सोडा आणा आणि कळकट घाणेरड्या उशा करा स्वच्छ, पाहा खास उपाय

घड्याळाच्या मदतीने वॉल हँगिंग तयार करा

आपण जुन्या घड्याळ्याच्या मदतीने वॉल हँगिंग तयार करू शकता. आपल्याला फक्त दोरीच्या साहाय्याने घड्याळ लटकवायचे आहे. व दोरीला जुन्या बांगड्या चिटकवा. आपण घड्याळ्याच्या आत विविध गोष्टी चिटकवून, सजवू देखील शकता. 

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल