Join us  

तळल्यानंतर उरलेल्या तेलाचं काय करायचं? फेकायचं तरी कसं? त्यावर उपाय- पाहा व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 12:13 PM

तळलेल्या तेलाची विल्हेवाट कशी लावायची हा मोठा प्रश्न असतो, त्यासाठीच पाहा हा खास उपाय...

ठळक मुद्देतळलेल्या तेलाचं काय करायचं असा प्रश्न असेल तर हा व्हिडिओ नक्की बघासिंक चोकअप होणार नाही, घासणीही चिकट होणार नाही, उरलेल्या तेलाची अशी लावा विल्हेवाट

आपल्यापैकी अनेकांना तळलेले पदार्थ फार आवडतात. कधी पापड तर कधी वडे कधी आणखी काही. आपण घरातही सतत काही ना काही तळत असतो. पदार्थ तळल्यानंतर कढईमध्ये जास्त तेल राहीले तर आपण ते पोळीला किंवा आणखी कशाला लावण्यासाठी वापरतो. पण कमी तेल असेल आणि त्याच्या खाली काही गाळ राहिलेला असेल तर मात्र आपण हे तेल पुन्हा वापरत नाही. आता असे कढईत राहिलेल्या तेलाचे काय करायचे असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. सिंकमध्ये हे तेल टाकले तर संपूर्ण सिंक तेलकट होते आणि चोकअप होण्याचीही शक्यता असते. अशावेळी कढईतले तेल फेकून देण्यासाठी एक सोपी ट्रीक.

(Image : Google)

इन्स्टाग्रामवर याबद्दलचा एख अतिशय उत्तम व्हिडिओ शेअर करण्यात आला असून यामध्ये ही हटके ट्रीक देण्यात आली आहे. वॉशी वॉश क्लिनटोक या इन्स्टा पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून तेल काढून टाकण्याची भन्नाट आयडीया पाहून तुम्हीही खूश व्हाल आणि याचा नक्कीच वापर कराल. अवघ्या १५ दिवसांत या व्हिडिओला १ लाखांहून अधिक लाइक्स आले असून ८२ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेकांनी ही आयडीया चांगली असल्याने त्याचे कौतुक केल्याचे व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. एकदा वापरलेले तेल टॉक्सिक होते आणि त्यात ट्रान्स फॅट वाढतात. त्यामुळे आपण ते टाकून देणेच पसंत करतो. पण हे तेल कसे टाकून द्यायचे अशी चिंता राहू नये असे वाटत असेल तर पाहूया तेलाची विल्हेवाट लावायची सोपी पद्धत...

१. कढईमध्ये उरलेले तेल गार होऊ द्या.

२. या तेलात खाली काही गाळ उरलेला असतो, तसेच ते आहे त्यापेक्षा गडद रंगाचे झालेले असते. 

३. या तेलामध्ये बेकींग सोडा किंवा सोडा बायकार्बोनेट घाला.

४. सोड्यामध्ये तेल शोषले जात जाते. आता ते घट्ट होईल.

५. यानंतर ही पेस्ट एखाद्या कागदावर घेऊन टाकून द्या.

६. हे एकत्र करण्यासाठी बेकींग पेपरचा वापर करा असा सल्लाही व्हिडिओमध्ये देण्यात आला आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.स्वच्छता टिप्स