Join us  

इंडियामे क्या चल रहा है? कोण आणि का आहे व्हायरल? - वर्षभराची झलक झटक्यात सांगणारी गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2022 12:55 PM

Viral Funny Video of Two Little Girls: सोशल मिडियावर व्हायरल होणारे काही व्हिडिओ खरोखरच खूप मजेशीर असतात. मिम्स गाजतात, त्यात विनोद असतोच पण सामाजिक विरोधाभासही ते अधोरेखित करतात.

ठळक मुद्देहलकं- फुलकं, विनोदी आणि लहान मुलींच्या निष्पाप भावनेतून आलेलं काही पाहायचं असेल, तर हा गंमतीदार व्हिडिओ एकदा नक्की बघा.  

छोटे- छोटे रिल्स बनवून इन्स्टाग्रामवर शेअर करण्याचा ट्रेण्ड सध्या भन्नाट गाजतो आहे. यातले काही व्हिडिओ खरोखरच मजेशीर असतात. तर काही व्हिडिओ आपल्याला विचार करायला लावतात. सध्या दोन लहान मुलींचा एक छानसा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच गाजतो आहे.दोन छोट्या मुली, त्यातली  मोठी मुलगी छोटीला विचारते की आज कल इंडियामे क्या चल रहा है? या प्रश्नाचं ती छोटी मुलगी जे उत्तर देते, ते भलतंच मजेशीर आहे. ती सांगते दिल पुकारे आणि पतली कमरियाची गोष्ट. तेच बेशरम रंग या दीपीकाच्या बिकिनी गाण्याचं. अनेकांनी त्यावर आपापले रिल्स केले. अगदी एका जपानी मुलीचाही व्हिडिओ व्हायरल आहे. असंख्य व्हिडिओ आणि रिल्स फिरत असतात ते कधी सामाजिक व्यंग सांगतात तर कधी जगण्यातले विरोधाभास. २०२२ हे वर्ष कसं गेलं हे पहायचं असेल तर ते आता मिम्स आणि रिल्स यांना वगळून पाहताच येणार नाही.

त्वचा, आरोग्य आणि केस! राहतील एकदम परफेक्ट, वाचा आहारतज्ज्ञांनी सांगितलेला खास उपाय... 

म्हंटलं तर केवळ साडेतीन सेकदं किंवा १ मिनिटापर्यंतचे हे व्हिडिओ, स्टंट करणारे, लग्नातल्या एण्ट्रीचे, फोटो शूट करता करता होणाऱ्या पडझडीचे ते अगदी राजकीय टीकाटिप्पणी करणारे, फूड ब्लॉगर्सच्या अर्तक्य खाण्याचे, भलभलत्या पदार्थांचे. २०२२ या वर्षाला बाय म्हणतात अगदी दीपीका ते फुटबॉल ते पेले ते रिषभ पंतचा दुर्देवी अपघात यासंदर्भातलं सारं सोशल मीडियात दिसतं. अगदी गाडी हळू चालव असं रिषभला सांगणारा शिखर धवनचा व्हिडिओही व्हायरल होतो.या व्हायरल फूटप्रिण्ट ही नव्या काळाची गोेष्ट आहे.

 

जी गोष्ट व्हायरल रिल्सची, तीच मिम्सची. इतके जबरदस्त मिम्स आणि त्यातली विनोदबूद्धी की कुणालाही क्षणात हसू यावं. राजकीय सामाजिक विचारसरणीच्या पलिकडे केवळ जगण्यातल्या गमती शोधणारे, त्यावर हसत टीका करणारे, बोचरे फटके मारणारे मिमर्स हेदेखील या वर्षीचं वैशिष्टय म्हणायला हवं.

सोशल मीडिया व्हायरलच्या नव्या काळात साडेतीन सेकंदाची फेम आणि लाइक्स याचं अनेकांना आकर्षण असलं तरी त्यातलं सातत्य आणि ताजेपणा टिकवणं सोपं नाही. त्यामुळेच काही गोष्टी विरुन जातात काही अजून नव्या रुपात येतात.२०२३ मध्ये या जगात काय घडतं पाहावं लागेल.. आणि दिसेलच. कारण इंडियामे आजकाल रिल्स चल रहे है..

 

टॅग्स :सोशल व्हायरलभारतनृत्य