स्त्री असो किंवा पुरूष हेअर कट करणं अगदीच नॉर्मल आहे. पण तुम्ही कसा हेअरकट करता आहात, याला खूप महत्त्व आहे. जर तुम्ही खूपच मस्त हेअर कट केला आणि त्यामुळे तुमचा लूक एकदम हटके झाला, तर लोक नक्कीच तुमच्याकडे वळून पाहतात आणि चांगल्या भावनेनी तुमच्या हेअर कटची चर्चा करतात. पण शिल्पा शेट्टीच्या बाबतीत मात्र सगळंच उलटं झालं आहे. तिने असा काही विचित्र हेअरकट केला आहे, की तिच्याकडे पाहताच तिचे फॅन्स चक्क डोळे झाकून घेत आहेत.
'आतापर्यंत तर चांगली होती, आता मध्येच हे काय केलं या बयेनं?' अशा काही प्रतिक्रिया शिल्पा शेट्टीच्या चाहत्यांनी तिचा हेअरकट पाहून दिल्या आहेत. आपल्याला माहितीच आहे, की शिल्पा सध्या सोशल मिडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असते. ती फिटनेसविषयी किंवा मनाच्या शांतीविषयी तिच्या चाहत्यांना नेहमीच मोटीव्हेट करत असते. तिचे योगाचे फोटो आणि व्हिडियो पाहून तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे शिल्पाचा एखादा फोटो किंवा व्हिडियो सोशल मिडियावर येताच तिच्या चाहत्यांच्या त्याच्यावर अक्षरश: उड्या पडत असतात.
असाच एक व्हिडियो शिल्पाने दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडियो पाहून तिच्या चाहत्यांना मात्र चांगलाच धक्का बसला आहे. या व्हिडियोमध्ये शिल्पा पाठमोरी बसली असून तिचा हेअर कट सुरू आहे. हा हेअरकट एवढा विचित्र आहे, की त्यामध्ये एक व्यक्ती चक्क वस्तारा हातात घेऊन शिल्पाचे मागच्या बाजूने पुर्ण टक्कल करत आहे.
वरचे केस जसेच्या तसे मात्र मानेच्या वरच्या भागापासून ते चार ते पाच बोटे एवढ्या अंतरावरचे सगळेच केस शिल्पाने पुर्णपणे भादरून टाकले आहेत. हा असा व्हिडियो पाहून ही अशी कशी शिल्पाची हेअर स्टाईल असं म्हणत चाहते चांगलेच गांगरून गेले आहेत. सध्या तिच्या या लूकची आणि हेअरकटची जबरदस्त चर्चा सोशल मिडियावर सुरु आहे.
हे असं काही विचित्र करायचं असेल, तर जबरदस्त हिंमत लागते. शिल्पाने ही हिंमत दाखवली खरी, पण तिचे चाहते मात्र तिच्यावर जाम नाराज झाले आहेत. अनेकांनी तिच्या या हेअरकटची खिल्ली उडवली आहे. शिल्पाने हा हेअरकट केल्यानंतर Triabal Squats या व्यायामाचा व्हिडियोदेखील अपलोड केला आहे. बझ कट buzz cut असे शिल्पाच्या हेअर कटचे नाव आहे.