डान्सचे वेड असलेल्यांना वेळ, ठिकाण, म्युझिक अशा कशाचेच काही पडलेले नसते. डान्स करायला आवडणारे लोक कधीही, कुठेही नाचायला लागू शकतात. त्यांना डान्स करायला इतके आवडते की त्यांना डान्स म्हटल्यावर आजुबाजूच्या परिस्थितीचे भानही राहत नाही. भारतीय सिनेमाविषयी प्रेम असलेले मात्र आता काही कारणाने परदेशात राहणारे लोक भारतीय संगीत, भारतीय नृत्य या सगळ्याला खूप मिस करतात. (Viral Video of Indian Girls) मात्र याठिकाणी काही ना काही करत त्या आपल्याकडील गोष्टींची आठवण कायम ठेवतात. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये ४ तरुणी ऐश्वर्या रॉयच्या एका खूप गाजलेल्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत (4 Indian Girls Dance On New York Times Square Barso re Megha Megha ).
ऐश पॅट नावाने इन्स्टाग्रामवर अकाऊंट असलेल्या एका तरुणीने आपल्या अकाऊंटवरुन हा डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. ती डान्सर असून डेंटीस्टही असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या तीन मैत्रिणींसह टाइम्स स्क्वेअरवर अतिशय बिनधास्तपणे आणि खूपच उत्तम डान्स करताना दिसत आहे. तर या डान्सचे निमित्त आहे टाइम्स स्क्वेअरवर पडलेला पाऊस. या पावसाच्या निमित्ताने या चौघी गुरू चित्रपटातील ‘बरसो रे मेघा मेघा, बरसो रे मेघा...’ य़ा गाण्यावर डान्स केला. या चौघींचे कोऑर्डीनेशन आणि त्या करत असलेल्या स्टेप्स यावरुन त्यांचा डान्स आधीच बसलेला असावा असे वाटत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ अतिशय कमी वेळात तुफान व्हायरल झाला आहे.
आतापर्यंत या व्हिडिओला १ कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले असून सोशल मीडियावर एखादी गोष्ट किती वेगाने व्हायरल होऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. अनेकांनी तरुणींच्या या डान्सवर छान छान प्रितिक्रियाही दिल्या आहेत. आपणही असं काहीतरी करायला हवं असं म्हणत काहींनी आपल्या मित्रमंडळींना कमेंटसमध्ये टॅग केले आहे तर काहींनी या मुलींच्या डान्स स्कीलचे कौतुक केले आहे. याआधीही एका भारतीय तरुणीने अशाप्रकारे टाइम्स स्क्वेअरवर डान्स केला होता. ‘नवाबजादे’ चित्रपटातील तेरे नाल नाचना या गाण्यावर तिने केलेल्या डान्सचा व्हिडिओ बराच व्हायरल झाला होता. या मुलीचे नाव पूजा जैसवाल होते आणि ती पेशाने फॅशन ब्लॉगर असल्याचे सांगितले जात होते. टाइम्स स्क्वेअर ही अतिशय प्रसिद्ध जागा असून याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे याठिकाणी अशाप्रकारे काहीतरी करणे ही खरंच व्हायरल होण्यासारखीच गोष्ट आहे.